महाड येथील नागेश्वरी नदी पात्रात मिळून आलेल्या एका वयोवृद्ध प्रेतामुळे विभागात भीतीचे वातावरण..

0
Spread the love

उपसंपादक-राकेश देशमुख

महाड: – महाड तालुका पोलीस ठाण्यात दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8 वाजल्यापासून ते दिनांक 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 6 च्या दरम्यान मौजे नागेश्वरी नदीच्या पात्रात मौजे विनहेरे, ता.महाड, जि.रायगड येथील मयत अशोक धाकू शिवदे वय 68 वर्षे रहाणार विनहेरे, वरची आळी हे दिनांक 1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8 च्या सुमारास दुकानातील कचरा नागेश्वरी नदीच्या पात्रात टाकण्यास गेले असता नदीच्या पात्रात पाय घसरून पडून वाहून गेले ते मयत अवस्थेत मिळून आले.

याची माहिती मिळताच महाड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. मायने यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली . त्यांच्या मार्गदर्शनाखाली या घटनेचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अवसरमोल व पोलीस हवालदार श्री.देसाई करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट