पोलीस मित्र संघटनेच्या महिला अध्यक्षपदी वीणा पिछाडिया यांची नियुक्ती…

उपसंपादक – रणजित मस्के
पुणे :- पोलीस मित्र संगठना नवी दिल्ली भारत या संघटनेच्या पिंपरी चिंचवड शहराच्या निवडी संस्थापक अध्यक्ष संतोष दादा चौधरी, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष उमेद सुतार यांच्या मार्गदर्शना खाली दिनांक 20 रोजी करण्यात आल्या. यात पिंपरी चिंचवड महिला अध्यक्ष वीणा पिछाडिया व महिला उपाध्यक्ष सुनीता अगरवाल यांची नियुक्ती करण्यात आली.


या प्रसंगी पुणे जिल्हा अध्यक्ष एजाज शेख, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सिकंदर पटेल, पुणे जिल्हा कार्याध्यक्ष रतनसिंह राजपुरोहित, पुणे जिल्हा महिला अध्यक्ष अमरीन पटेल उपस्थित होते. प्रसंगी सदस्यांच्या नियुक्त्या देखील करण्यात आल्या. यामधे उषा घुगे, सुनीता आल्हाट, पूनम गर्ग, सुजाता परदेशी, निशा निमसे, विजय जांभळे, प्रसाद बाळसराफ यांचा समावेश आहे.


येणाऱ्या सहा महिन्यात निवड झालेल्या सभासदांकडून सामाजिक कार्याचा आलेख उंचावल्यास चांगली संधी देण्यात येईल असा विश्वास देण्यात आला.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com