दिवसा घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार कोल्हापूर पोलीसांच्या ताब्यात..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

कोल्हापूर :

२ महिन्यापुर्वी अमेय अपार्टमेंट, नृसिंह कॉलनी येथे झालेली दिवसा घरफोडी चोरी करणारा अट्टल घरफोडी गुन्हेगारास अटक करुन त्याचेकडून चोरीस गेले सोन्याचे दागिणे व गुन्हयात वापरलेली
अॅक्टीव्हा मोपेड असा एकुण ४,२०,०००/- रुपयाचा माल हस्तगत
करवीर पोलीस ठाणे, गुन्हे शोध पथकांची धडक कारवाई.

पोलीस ठाणे

करवीर पोलीस ठाणे

गुन्हा रजि नं व कलम

६१४/२०२४, भारतीय न्याय संहिता कलम ३३१ (३), ३०५ (५) प्रमाणे

फिर्यादी नांव व पत्ता श्रीमती संपदा विलास झलगे, रा. रुम नं.ए, ५०५, ५ वा मजला, अमेय अपार्टमेंट, फुलेवाडी, कोल्हापूर

गु. घडला ता व वेळ

१,५०,०००/-

मिळाला माल

माहिती कशी मिळाली

दि. ०१/१०/२०२४ रोजी सकाळी ०७.३० वा ते सायंकाळी ६.०० वाचे दरम्यान मुदतीत फिर्यादी यांचे राहते घरी अमेय अपार्टमेंट, फुलेवाडी, कोल्हापूर

५०,०००/-रु त्यात अंदाजे २७.८४ ग्रॅम वजनाचे हातातील सोन्याच्या बांगड्या ४ नग मि.कि.स.

आरोपी याचा ताबा घेऊन

रु त्यात अंदाजे १०.१२० ग्रॅम वजनाचे सोन्याचे लहान मंगळसुत्र १ नग जु.वा.कि.स.

१,५०,०००/-
रु त्यात अंदाजे ३०.३२० ग्रॅम सोन्याचे पेंडणसह गंठण १ नग जु.वा.कि.स.

५०,०००/- रु. त्यात अंदाजे ९.६३० ग्रॅम वजनाचे सोन्याची चेन १ नग जु.बा.कि.स.

कारवाई करणारे पोलीस अधिकारी व अंमलदार

मा. पोलीस अधीक्षक, श्री महेंद्र पंडीत सो मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती जयश्री देसाई सो
यांचे मार्गदर्शनाखाली
मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री सुजितकुमार क्षीरसागर सोो
मा. पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, सपोनि बाबासाहेब सरवदे, पोसई युवराज धोंडे, अंमलदार-सुजय दावणे, रणजित पाटील, योगेश शिंदे, अमित जाधव, विजय पाटील, प्रकाश कांबळे, अमोल चव्हाण, महेश नाईक व सौमित्र पोवार

निष्पन्न आरोपीचे नांव व पत्ता
मयुर उर्फ अमित सोपान भुंडे पाटील, वय ३७, रा. फ्लॅट नं. १०४, आई एकविरा अपार्टमेंट, गुरवली पार्क, टिटवाळा कल्याण, ठाणे थोडक्यात हकीगत: दि. ०१/१०/२०२४ रोजी सकाळी ०७.३० वा ते सायंकाळी ६.०० वाचे दरम्यान मुदतीत यातील फिर्यादी ह्या नोकरीच्या ठिकाणी शाळेत गेले असताना कोणीतरी अज्ञात चोरट्याने फिर्यादी यांचे संमतीशिवाय लबाडीचे इरादयांने त्याचे घराचे दरवाजाचे कुलूप कशाने तरी तोडुन आत घरात प्रवेश करुन त्याचे बेडरुममधील कपाटाचे कुलूप उचकटुन कपाटातील सोन्याचे दागिणे व रोख रक्कम ही चोरुन नेलेने फिर्यादीने दिले फिर्यादी वरुन वरील प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आलेला आहे.

सदर गुन्हयाचा तपास करीत असताना अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज चेके असता सदर गुन्हा हा अट्टल दिवसा घरफोडी चोरी करणारा गुन्हेगार मयुर उर्फ अमित सोपान भुंड पाटील याने केला असल्याचे निष्पन्न झालेनंतर सदर घटनास्थळाचा तसेच आरोपी यास यापुर्वी डिसेंबर २०२२ मध्ये घरफोडीच्या गुन्हयात अटक केली असल्याने त्यावेळेची प्राप्त तांत्रीक माहिती घेऊन सदर आरोपी राहत असले टिटवाळा येथे गेलो असता त्यास नाशिक पोलीसांनी त्याचेकडील घरफोडी चोरी अटक केली असल्याची माहिती मिळाली त्याप्रमाणे नाशिक जिल्हयातील गंगापुर पोलीस ठाणेस अटक असल्याचे माहिती मिळाली.

मा कोर्टाचे आदेशान्वये सदर आरोपी यांचा नाशिक येथुन ताबा वॉरंटाव्दारे ताबेत घेऊन त्यास गुन्हयात अटक केली व त्याची मा कोटांतुन पोलीस कस्टडी रिमांड घेऊन त्याचेकडे तपास केला असता त्याने सदर गुन्हयाची कबुली दिली आहे व सदर गुन्हयातील चोरीस गेलेले वर नमुद वर्णनाचे व किंमतीचे सोने तसेच गुन्हयात वापरलेली अॅक्टीव्हों मोपेड ही त्याचेकडुन जप्त केली आहे. सदर आरोपी यांचेकडे आणखीन दिवसा घरफोडीचे गुन्हे उघडकीस येणेची शक्यता असल्याने त्यादृष्टीने तपास करीत आहोत. सदर आरोपी याने आतापर्यंत ४० हुन अधिक घरफोड्या केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट