साताऱ्यात वैदेही मल्टीस्टेट को-ऑ.सोसायटी खाखरवाडीत 1 कोटी 8 लाख रकमेचा अपहार करणारे आरोपी अखेर अटक…
उपसंपादक-रणजित मस्के
सातारा: आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांची कारवाई वैदेही मल्टीस्टेट अँग्रोको-ऑपरेटीव्ह सोसायटी साखरवाडी ता.फलटण जि.सातारा येथील कंपनीत सामान्य लोकांनी गुंतवणुक केलेल्या आतापर्यंतच्या तपासामध्ये १ कोटी आठ लाख रुपये रुपये रकमेचा अपहार करणारे गुन्यात आठ महिन्यापासून पाहिजे असले आरोपी यांना अटक करण्यात मोठे यश आले आहे.

मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व मा.बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी सातारा जिल्ह्यामधील दाखल असलेल्या गुन्ह्यांमधील पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करण्याच्या सूचना मा. मोहन शिंदे, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांना दिलेल्या होत्या. त्याअनुषंगाने मा. मोहन शिंदे, पोलीस उप-अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांनी आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस अधीकारी यांना त्यांचेकडे तपासाकरीता असलेल्या गुन्ह्यात

पाहिजे असलेल्या आरोपींना अटक करणेबाबत सूचना दिल्या होत्या.
वैदेही मल्टीस्टेट अँग्रोको-ऑपरेटीव्ह सोसायटी साखरवाडी ता. फलटण जि.सातारा येथील कंपनीत चेअरमन, संचालक व इतर यांनी सामान्य जनतेला आमिष दाखवून त्यांना कंपनीच्या विविध प्लॅन मध्ये पैसे गुंतवण्यास सांगून तसेच पैसे गुंतण त्यास योग्य तो परतावा देण्यास सांगुन सामान्य जनतेची आर्थिक फसवणुक केलेबाबत दिनांक २९/०६/२०२२ रोजी फलटण ग्रामिण पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असून सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, सातारा हे करत हे आहेत. सदर गुन्हयाचे तपासामध्ये आजअखेर १ कोटी आठ लाख रुपये रुपये रकमेचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सदर गुन्हयातील आरोपी नामे १) सोमनाथ खंडू नेहे रा. एकदंत अपार्टमेंट ज्ञानेश्वर नगर पाथर्डी फाटा नाशीक २) शानेश्वर तुकाराम गाढवे रा. बोपर्डी ता. वाई जि.सातारा यांचा मागील आठ महिन्यापासून शोध घेतला असता मिळून येत नव्हते. मातील आरोपी क्रं. २ यास दिनाक ०६/०२/२०२३ रोजी सहा. पोलीस उपनिरीक्षक राजेश वायदंडे, पो. ना. मनोज जाधव ६९९ पोकों संकेत माने १९४९ यांनी वाई बोपडी परिसरात सापळा लावून अटक केली आहे.
मा. मोहन शिंदे, पोलीस उप अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा फलटण ग्रामिण पोस्टे गुरनं ४६७/२०२२ भादवि कलम ४२०, ४०९, ३४ महाराष्ट्र ठेवीदार हितसंबंध संरक्षण अधिनियम कलम ३ मधील आरोपीना अटक करणेबाबत तपास अधिकारी पोलीस निरीक्षक, एस. जी. गैंगजे यांना सूचना देवून पो. हवा. ताटे ८३१, पो.ना. जाधव ६९९ पो.ना.मोरे ४, चालक पो.ना. राऊत २०३७ असे तपास पथक तयार केले. त्यानुसार तसेच यातील मुख्य आरोपी क्रं १ सोमनाथ नेहे यास दिनांक १७/०२/२०२३ रोजी पुणे येथे येणार असल्याची माहिती आर्थिक गुन्हे शाखेतील पो.ना. जाधव ६९९ यांना मिळाली. त्यानंतर केलेल्या तांत्रिक विश्लेषणादवारे मिळालेल्या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी सापळा लावून कारवाई करणेकामी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी पुणे या ठिकाणी सापळा लावून आरोपीस ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांचा गुन्ह्यामधील सहभाग निष्पन्न झालेने नमुद गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आलेली आहे. रिमांडकामी त्यांना मा. विशेष सत्र न्यायालय, सातारा यांचे समक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने त्यांना ०७ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केलेली आहे. तसेच आरोपी आरोपी क्रं १ सोमनाथ नेहे, रा. नाशीक जि. सातारा याचेवर १) सरकारवाडा पोलीस स्टेशन जि. नाशीक येथे गुरनं ४७/२०१७ भा.द.वि.स. कलम ४२०, ४६५, ४६८, ४७१,४९९,३४,१२० (ब), २) गंगापूर पोलीस ठाणे जि. नाशीक गुरनं ११/२०१६ मोटार व्हेईकल अॅक्ट २०११८१,१२८, १०७, १८४ प्रमाण ३) सातारा शहर पोलीस ठाणे गुरनं ४३८,४०९, ४२०,३४] महाराष्ट्र ठेवीदारांचे हितसंबंध संरक्षण अधिनियम १९९९ चे कलम ३ प्रमाणे तसेच चेक बाउन्स (Negotiable instrument Act) १८८१ कलम १३८ मध्ये एकूण ३७ गुन्हे नाशीक जि. नाशीक येथे दाखल आहेत.
तसेच यातील आरोपी सोमनाथ नेहे याने वैदेही मल्टीस्टेट अँप्रो को-ऑपरेटीव्ह सोसायटी, ही कंपनी सातारा, वाई, फलटण तसेच नाशीक, ठाणे, इस्लामपूर, दादर मुंबई, अलीबाग, रत्नागिरी, दापोली, चंद्रपूर या ठिकाणी वर नमुद कंपनीच्या शाखा काढून सदर ठिकाणी गुतवणुकदार यांना विश्वासात घेवुन त्यांना मोठया प्रमाणात पैशाचे अमिष दाखवून त्यांचेकडून जमा झालेल्या रक्कमेचा अपहार केलेला आहे.
सदर कारवाईमध्ये मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व मा. बापू भांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा
यांच्या मार्गदर्शनाखाली व मा. मोहन शिंदे, पोलीस उप-अधीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, सातारा यांच्या अधिपत्याखाली तपास अधिकारी पोलीस निरीक्षक, सुरेश गेंगने, पो.हवा. प्रशांत ताटे ८३२, पो.ना.मनोज जाधव ६९९ पो.ना. संजय मोरे ४, चालक पो.ना. संतोष राऊत २०३७ यांनी सहभाग घेतला असून सदर कारवाईमध्ये सहभागी अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे मा. समीर शेख, पोलीस अधीक्षक, सातारा व मा. बापू बांगर, अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com