हत्याराने ठार मारून बाॅडी मारूंजी खाणींमध्ये टाकणाऱ्या आरोपीस पोलीसांकडून तात्काळ अटक…

उपसंपादक-रणजित मस्के
पुणे :- बातमी मिळाली की काही इसमांनी मिळून विक्की (पूर्ण नाव माहीत नाही) याचा खून करून त्याची बॉडी मारुंजी येथील खाणींमध्ये टाकली आहे व त्यातील 3 आरोपी हे नागेश्वर विद्यालय, पाटील नगर चिखली येथे नातेवाईक यांना भेटण्यासाठी आले आहेत.

त्याप्रमाणे तपास पथकाचे अधिकारी Api राम गोमारे, पोलीस अंमलदार बाबासाहेब गर्जे, भास्कर तारळकर, कबीर पिंजारी, तुकाराम वळकोली यांनी नागेश्वर विद्यालय, पाटील नगर चिखली येथे जाऊन सापळा लाऊन आरोपी नामे –
- मारुती जनक सातपुते वय 18 वर्षे रा. कोयते वस्ती पुनावळे
- ऋषिकेश नरसिंह वाघमारे वय 19 राहणार जांबे तालुका मावळ
- विशाल लक्ष्मण डाढर वय 21 वर्ष रा. कोयतेवस्ती रसिकवाडी पुनावळे
यांना शिताफीने ताब्यात घेतले, त्यांना विश्वासात घेऊन विचारणा केली असता त्यांनी दिनांक 26/9/2024 रोजी रात्री 9 वा चे सुमारास भांडणाचे कारणावरून मित्र नामे विक्की उर्फ शुभम सीताराम परिहार वय 21 रा जांभे याला जांभे ता मुळशी येथून घरून गाडीवर बसवून घेऊन येऊन मारूंजी येथील खाणीजवळ आणून भांडण करुन हत्यारांनी मारून त्याला खाणीतील पाण्यात टाकून दिले आहे, त्यामुळे आरोपी यांना सोबत घेऊन मारुंजी खाणीजवळ जाऊन रेस्क्यू टीमला बोलवून खात्री केली असता शुभम सीताराम परीहर याची बॉडी मिळालेली आहे.हिंजवडी पोलीस स्टेशन येथे खुनाचा गुन्हा दाखल होत आहे, तिन्ही आरोपींना हिंजवडी पोलीस स्टेशन यांच्या ताब्यात दिले आहे.
अशी माहीती विठ्ठल साळुंखे
वरिष्ठ पोलीस निरीक्षक
चिखली पोलीस स्टेशन यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com