सुमारे दिड वर्षापासून अपराध व फसवणुकीच्या गुन्हयात नजरेआड झालेला आरोपी अटक..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर :-सफाळे पोलीस ठाणे हद्दीत गणेश ज्वेलर्स या नावाने सोन्याचांदीचे दागिने बनविण्याचा भागीदारीमध्ये व्यवसाय करणारे व्यापारी १) कानाराम दलाराम चौधरी, वय ४४ वर्षे, मुळ रा. गाव मोरया-सिंदर्ली पोलीस ठाणे-सादडी, रेल्वे स्टेशन-पलासा, ता. देसुरी जि. पाली, राज्य राजस्थान २) हितेश शांतीलाल ढोलकिया, रा. रुम नं. ७०७ सातवा मजला विवासिटी बोळींज प. ता. वसई जि. पालघर मुळ रा. मालागांव ता. केसोड, जि. जुनागड, राज्य गुजरात यांनी माहे जानेवारी २०२२ ते दि.२७/०४/२०२४ रोजी पावेतो सफाळे परिसरातील सोन्याचे दागिने बनविणारे गि-हाईकांचा विश्वास संपादन करुन, गि-हाईकांनी दुरुस्ती करण्यासाठी व नविन सोन्याचे दागिने बनवुन घेण्यासाठी दिलेले जुने सोन्याचे दागिने आणि त्यांची रक्कम असा एकुण १,३८,१८,०००/- रु. (एक कोटी अडोतिस लाख अठरा हजार रुपये मात्र) किंमतीचा ऐवज गि-हाईकांना परतफेड न करता दुकाण बंद करून पळून गेल्याने त्यांचे विरुध्द सफाळा पोलीस ठाणे गु.र.नं. ४६/२०२३ भादंविसंक ४०६, ४०९, ४२०, ३४ प्रमाणे दि. १०/०५/२०२३ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर गुन्हयात आरोपी हितेश शांतीलाल ढोलकिया यास दि.१२/०५/२०२३ रोजी अटक करण्यात आली होती व तेंव्हापासुन आरोपी कानाराम दलाराम चौधरी हा त्याचे मुळ गावी न जाता त्याचे अस्तीत्व लपवुन राहत होता. त्याचा मुळ गावी व इतरत्र काही एक थांगपत्ता मिळून येत नव्हता.

बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/ प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांनी पोउनि/सुनिल नलावडे, पोउनि / राजेश वाघ, पोहवा/संदिप सुर्यवंशी, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/ राकेश पाटील सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांचे पथक तयार केले. सदर पथकाने सुमारे दिड वर्ष फरार असलेला आरोपी कानाराम दलाराम चौधरी यास दि.२०/०९/२०२४ रोजी इंदौर, मध्यप्रदेश राज्य येथून ताब्यात घेवुन अटक करुन त्याचेकडे गुन्हयाचा अधिक तपास करुन गुन्हयातील अपहारीत मुद्देमालापैकी १७,७१,१८३/- रु. चे सोन्याचे दागिने व रोख रक्कम जप्त केलेला आहे. सदर गुन्हयाचा पुढिल तपास पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com