दरोड्यासह अपहरण करून पळून गेलेल्या आरोपींना २४ तासाचे आत स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी केले जेरबंद…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :- दिनांक १/९/२०१३ रोजी १.०० वा. सुमारास हॉटेल नेशन ११ विसावानाका सातारा प आणासाहेब कल्याणी हायस्कूल ते विसावा साताराकडे जाणारे रोडवर इसमांनी फिर्यादी यास “तु आमची खुन्नस काढतो का ? तु आमच्या साथीदाराला मारतोस काय ? असे म्हणून त्यातील एकाने फिर्यादी याचे डोक्यात घातक हत्याराने वार केला, तसेच इतरांनी पट्ट्याने व लाकडी दांडक्याने फिर्यादी व त्याच्या मित्रास मारहाण करुन फिर्यादी यास मोटार सायकलवरून कुरणेश्वर जकातवाडी ता. सातारा येथे पळवून नेऊन त्याच्याकडील रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेवून पळून गेले होते, सदर बाबत सातारा शहर पोलीस ठाणे येथे गुरनं ७३३/२०२३ भादंवि कलम ३९७,३६३ अन्वये गुन्हा नाद करण्यात आला आहे. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्याने श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री.बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना गुन्हयातील सर्व आरोपी निष्पन्न करुन त्यांना पकडण्याच्या सूचना दिल्या होत्या, त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील यांच्या अधिपत्याखाली एक विशेष तपास पथक तयार केले आहे.
आज दिनांक २/९/२०२३ रोजी पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील व विशेष तपास पथकाने नमुद गुन्हयातील आरोपी यांची गोपनिय बातमीदारा मार्फत माहिती काढुन सातारा शहरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी सापळे लावून गुन्हयातील ४ आरोपी व एका विधी संघर्षग्रस्त बालकास सातारा शहर परिसरातून ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करीता सातारा शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रविंद्र भोरे, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील, विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलीस अंमलदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, लैलेश फडतरे, शरद बेबले, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, अमित झेंडे, अजय जाधव, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, मोहन पवार, विक्रम पिसाळ, ओंकार यादव, स्वप्निल कुंभार, अमित माने, अरुण पाटील, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे यांनी सदरची कारवाई केली आहे. कारवाई मधील सर्व अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्री.बापू बागर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे.
आरोपी 1) शंतनु रामचंद्र पवार ,2) ॠषीकेश गणेश त्रिगुणी 3) साहील सतिश नलावडे आणि 4) क्षितिज संतोष पवार सर्व वय वर्ष 19 , रहाणार मंगळवार पेठ, सातारा यांना जेरबंद केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com