तलासरी पोलीस दलाकडून जबरी घरफोडी चोरी करणारा आरोपीकडून गावठी कट्टा सह कब्जात..!

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

तलासरी:-तलासरी पोलीस ठाणे हद्दीत उधवा दुरक्षेत्र येथे या महाराष्ट्र आणि दादरा नगर हवेली या आंतरराज्य सिमेवरील बॉर्डर चेक पोस्टवर पो.उप निरीक्षक अमोल चिंधे, पोना/२५५ अरविंद रमेश दुमाडा, व पोशि/३१८ एस. आर. पवार असे नाकाबंदी करीत असतांना गुप्त बातमीदारा मार्फत त्यांना एक इसम हा गावठी कटटा व जिवत रांऊड त्याचे ताब्यातील मोटार सायकल वरुन खानवेल बाजुकडुन घेवुन येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाल्याने त्यांनी त्वरीत नाकाबंदी सतर्क करुन

चेकींग सुरु केली असता, खानवेल बाजुकडुन MH.48.AM.5046 या मोटार सायकलवर आलेला संशयीत इसम यास थांबवुन पोलीसांनी त्याचे नांव गाव विचारता त्याने त्यांचे नाव सुरेश वाज्या पन्हाड, वय ५० वर्ष, रा. वडवली डोगरीपाडा, ता. तलासरी, जि. पालघर असे सांगितले. त्याची मोटार सायकलची झडती घेतली असता, आरोपी यांचे कब्जात एक काळया रंगाचा लोखंडी गावठी कट्टा (अग्निशस्त्र) व गावठी कट्टयामध्ये वापरात असलेले २ जिवंत काडतुस असा एकुण ९१,०९०/- रु. किमंतीचे घातक शस्त्र विनापरवाना जवळ बाळगले असतांना मिळून आला. तसेच जिल्हाधिकारी पालघर यांचा मनाई आदेश लागु चा भंग केल्याने नमुद इसमाचे विरुध्द तलासरी पोलीस ठाणे गु.र.नं. २३५/२०२४ भारतीय हत्यार अधिनियम कलम ३, २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक अमोल चिंधे, नेम. तलासरी पो. ठाणे हे करीत आहेत.

आरोपी सुरेश वाज्या पन्हाड यांचेबाबत अधिक माहिती घेता, नमुद आरोपी हा रेकॉर्ड वरील गुन्हेगार असून त्यांचे पालघर व मिरा-भाईंदर पोलीस आयुक्तालयातील विविध पोलीस ठाणे अभिलेखावर एकुण २२ मालमत्तेविरुध्दचे घातक शस्त्रांसह दरोडा, जबरी चोरी, घरफोडी चोरी व चोरी असे गुन्हे दाखल आहेत. नमुद आरोपींचे गुन्हेगार टोळींवर सन २०११ मध्ये मनोर पोलीस ठाणे गुन्हा रजि नं. ५२/२०११ या गुन्हयांत महाराष्ट्र गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम १९९९ अंतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक पालघर, विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक पालघर, अनिल लाड, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग, अभिजीत धाराशिवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, पालघर विभाग यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा पालघर, पोनि/विजय मुतडक, प्रभारी अधिकारी तलासरी पोलीस ठाणे, सपोनि/अनिल व्हटकर, पोउनि/रोहीत खोत, पोउनि/गणपत सुळे, स्थानिक गुन्हे शाखा, पोउनि/अमोल चिंधे, तलासरी पोलीस ठाणे, व पोहवा/नरेंद्र पाटील, पोहवा/दिनेश पाटील, पोहवा/दिपक राऊत, पोहवा/दिलीप जनाठे, पोहवा/संतोष निकोळे, पोना/ कल्याण केंगार, पोअं/ प्रशांत निकम, पोअं/ वैभव जामदार सर्व नेम. स्थानिक गुन्हे शाखा, पालघर पोहवा/दुमाडा, व पोशि/पवार नेम. मुख्यालय यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट