जुन्या भांडण्याचा रागातून बेकायदा 25 माणसांसह मारहाण करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल…

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:
महाड शहर पोलीस ठाण्यात श्री. राजु किसन पवार रहाणार करंजाडी, आदिवासी वाडी, ता.महाड, जि.रायगड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार 1) नितीन जाधव रहाणार भेलोशी , 2 ) अमोल मुकणे आणि इतर २० ते २५ आरोपी यानी दिनांक १५ ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता महाड बाजारपेठेत जुन्या भांडणाचा राग मनात धरून तसेच इतर 20 ते 25 अनोळखी गैरफायदा मंडळी जमवून फिर्यादी व साक्षीदार यांना शिवीगाळ करून हाथाबुकयाने व लाथेने मारहाण करुन आरोपी नितीन जाधव याने फिर्यादी राजु पवार याच्या डोक्यात कोणत्यातरी धातूच्या वस्तूने मारुन दुखापत केली तसेच भांडणमधील साक्षीदार यांच्या गळ्यातील वाटी मंगळसुत्रामधील सोन्याचे पान तोडुन गहाळ करुन नुकसान केले आणि धमकी दिली.

म्हणून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. खोपडे यांनी घटनास्थळी भेट दिली त्यांच्या मार्गदर्शनाखाली आरोपी विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 143,147,149,323,324,504,406,427 अन्वये गुन्हा दाखल केला असून याबाबतचा अधिक तपास सहाय्यक फौजदार लांगे आणि पोलीस हवालदार कवळे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com