मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीस ८ तासात शोध घेवून औंध पोलीसांनी ठोकल्या बेड्या …

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

सातारा : आरोपींच्या मुसक्या आवळून केले जेरबंद औध पोलीस ठाणे कडील एक गुन्हा व फलटण पोलीस ठाणे कडील एक असे दोन गुन्हे केले उघड.

औध पोलीस ठाणे हदीत मौजे गोरेगाव (वांगी) ता. खटाव जि.सातारा गावी यातील फिर्यादी ऊसतोड कामगार अशोक देवीदीस चौरे हे दि.७/३/२०२३ रोजी रात्रौ ११.०० वा. चे सुमारास आपले कोपटात डाऊन लाईट गोल्ड ओपो एफ २१ प्रो कंपनीचा मोबाईल किंमत रुपये २५,०००/- चा चार्जिंगला लावुन झोपले असता दिनांक ०८/०३/२०२३ रोजीचे सकाळी ०६.०० वा. चे पुर्वी कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरुन नेहला आहे म्हणून वगैरे मजकूरची खबरीवरुन आंघ पोलीस ठाणे गु.र.नं.८१/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तांत्रिक माहीतीच्या आधारे शोध घेवुन सदर आरोपीस आष्टा ता. वाळवा, जि. सांगली येथुन ताब्यात घेवुन चोरीस गेलेला माल जप्त करण्यात आलेला आहे.

तसेच सदर गुन्ह्याच्या तपासामध्ये आरोपीकडुन एक मोटार सायकल जप्त करण्यात आलेली आहे. सदर मोटार सायकलबाबत फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. २६५/२०२३ भा.द.वि.स. कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदरचा गुन्हा हा उघडकीस आणला आहे.

सदर गुन्ह्याचे तपासाबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे औंध पोलीस ठाणेचे प्रभारी स.पो.नि. दराडे व त्यांचे सहका-यांनी सदर घडलेल्या गुन्ह्याबाबत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करुन सदर आरोपीस रातोरात्र अटक करुन आरोपीकडून चोरीस गलेला माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक, सो. श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अधि. दहिवडी विभाग कॅम्प वडूज श्री. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली आंघ पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक डी. पी. दराडे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे. पोहवा. आर. एस. सरतापे ब.नं.६८३. पो. हवा. कांबळे ब.नं. १६५९.पो.कॉ. के. एल. जाधवब.नं. २६११. के. एन. हिरवे ब.नं.५१०.पो.कॉ. एस. एस. पोळ ब.नं.१८८२. गृहरक्षक प्रसाद प्रकाश यादव सनद नं.८३५६ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट