साताऱ्यातील औंध पोलीसांनी घरफोडीच्या गुन्ह्यामधील आरोपीच्या ५ तासाचे आत आवळल्या मुसक्या..

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सातारा:– औंध पोलीस ठाणे हद्दीत मौजे येळीव ता. खटाव जि.सातारा गावी घाण्याचा मळा नावचे शिवारात सौ. मनिषा हणमंत जानकर यांचे राहते घरात दिनांक ०२/०३/२०२३ रोजी सकाळी १०.०० ते १८.०० वा.सुमारास घडला असून यातील फिर्यादी व तिची मुलगी कु.स्नेहल असे दोघी सकाळी १०.०० वा. चे सुमारास शेतात काम करण्यासाठी गेले व सायंकाळी १८.०० वा. चे सुमारास शेतातील काम संपवून घरी आले. त्यावेळी घराचा दरवाजा उघडा असल्याचे दिसले त्यावेळी फिर्यादी हिने घरात जावून पाहिले असता तिने लोखंडी कपाटामध्ये ठेवलेल्या कपाटाचे झाकण उघडे दिसले. तसेच शेजारी सामान अस्ताव्यस्थ पडलेले दिसले. म्हणून तिने डबा चेक केला असता त्या डब्या मध्ये तिने ठेवलेले एक जोडी सोन्याचे कानातील टॉप्स व वेल डब्यामध्ये दिसले नाही. यावरुन खात्री झाली की, घरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने ४५,६३८ रुपये किंमतीच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आहे. म्हणून वगैरे मजकूरची खबरीवरुन औध पोलीस ठाणे गु.र.नं. ८०/२०२३ भा.दं.वि.सं. कलम ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करणेत आला असून घटनास्थळाजवळील उस तोड टोळया व गोपनिय माहिती काढून सदर गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे घोंडीराम महादेव शिंगाडे वय ४० वर्षे रा. शिरताव ता.माण जि.सातारा याचा अवघ्या ५ तासात शोध घेवून त्यास गुन्ह्याचे कामी अटक करुन यातील फिर्यादीचा ४५.६३८/- रुपये किंमतीचा सोन्याचे दागिण्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तसेच सदर संशयीत आरोपी याने औध पोलीस ठाणे गुरनं. २४ / २०२३ भादविस ४५४४५७,३८० हा गुन्हा केल्याबाबत कबुली दिली आहे. दोन्ही गुन्हयातील १०० टक्के मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे तपासाबाबत वरिष्ठ अधिकारी यांनी सूचना दिल्या होत्या त्याप्रमाणे औंध पोलीस ठाणेचे प्रभारी स.पो.नि. दराडे व त्यांचे सहका-यांनी सदर घडलेल्या गुन्ह्याबाबत गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी निष्पन्न करुन सदर आरोपीस ५ तासाचे आत अटक करुन आरोपीकडून चोरीस गलेला माल हस्तगत करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचा तपास मा. पोलीस अधीक्षक सो, सातारा श्री. समीर शेख, मा. अपर पोलीस अधीक्षक, सो, श्री. बापू बांगर, मा. उपविभागीय पोलीस अघि दहिवडी विभाग कॅम्प वडूज श्री. निलेश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली आँध पोलीस स्टेशनचे सहा. पोलीस निरीक्षक डी.पी. दराडे, पोलीस उपनिरीक्षक गंगाप्रसाद केंद्रे, पोहवा.पी.पी.पाटील बनं.५८१, पोना. एस. एच. पाडळे बनं. २३५४, पोहवा. आर. पी. कांबळे बनं. १६५९ गृहरक्षक धिरज धनाजी नलवडे सनद नं.८३३८, गृहरक्षक सुधीर बापु मदने सनद नं.८३४९ यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे. सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे श्री. समीर शेख पोलीस अधिक्षक सो, सातारा व श्री. बापू बांगर अपर पोलीस अधीक्षक सो, सातारा यांनी अभिनंदन केले आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट