नवविवाहीतेचा शारीरीक, व मानसिक छळ करणाऱ्या आणि तिचे मरणास कारणीभूत ठरणाऱ्या आरोपी पतीस ठोठावली 7 वर्षे सश्रम कारावास व द्रव्य दंडाची शिक्षा..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :-माननीय श्री. ए. टी. वानखेडे, प्रमुख सत्र न्यायाधीश, न्यायालय गोंदिया यांनी दिनांक- 04/03/2024 रोजी चे आदेशांन्वये गुन्ह्यातील क्रं .1 आरोपी पतीस शिक्षा ठोठावली आहे…..

याबाबत थोडक्यात हकीकत अशी की, गुन्ह्यातील मृतक नामे- रोशणी नितेश नेवारे वय 24 वर्ष हिचे लग्न सन 2017 रोजी यातील आरोपी क्र.1) नितेश सोमाजी नेवारे याचेशी जाती रिवाजाप्रमाने झाले होते. लग्नाचे तीन महिण्यानंतर मृतकचे पती व ईतर 4 आरोपीतांनी संगणमत करुन मृतक- रोशनी हिस आपले माहेरुन चारचाकी गाडी विकत घेण्यासाठी दोन लक्ष रुपये मागुन आण असे म्हणुन मारपीट करुन तिला शारीरीक, मानसिक त्रास देवुन , छळ करून आणि मुलं होत नाही असे वारंवार टोचुन बोलुन तिचे मरणास कारणीभुत झाल्याने व मृतकचे वडील फिर्यादी यांचे जवाबावरुन मर्ग क्र.12/2018 कलम 174 जा. फौ. अन्वये चौकशी करुन गुन्हा क्र. 121/2018 कलम 498 (क), 304 (ब), 34 भा. दं. वि. अन्वये नोंद करुन तपास करण्यात आला आहे…

सदर गुन्हयाचे रितसर तपासा दरम्यान गुन्ह्यातील आरोपी -1) नितेश सोमाजी नेवारे 2) सोमाजी गणुजी नेवारे

3) सौ.पारबताबाई सोमाजी नेवारे 4) सुकचंद गणु नेवारे 5) सौ.गिताबाई सुकचंद नेवारे सर्व रा. कलारीटोला ता. जि. गोंदिया यांचे विरुध्द गुन्हा निष्पन्न झाल्याने नमुद पाचही आरोपीतांविरुध्द नमूद गुन्ह्यात दोषारोप पत्र क्र.54/2018 दिनांक 24/07/2018 अन्वये तयार करुन मा. न्यायालयात दाखल करण्यात आले होते . मा. न्यायालयाकडुन केस क्र.233/2018 दिनांक 24/07/2018 अन्वये न्यायालयात खटला चालविण्यात आला.

सदर गुन्ह्याच्या खटल्यामध्ये मा. सत्र न्यायाधिश श्री. ए.टी. वानखेडे साो, सत्र न्यायालय, गोंदिया यांनी दिनांक 04/03/2024 रोजी आरोपी क्र.1) नितेश सोमाजी नेवारे रा. कलारीटोला ता. जि. गोंदिया यास सदर गुन्ह्यात कलम 304 (ब) भा.दं. वी. अन्वये 7 वर्ष सश्रम कारावास व 3000/-रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास 4 महिने सश्रम कारावास. तसेच कलम 498 (अ) भा.दं.वी. अन्वये दंडनिय गुन्ह्यासाठी 3 वर्ष सश्रम कारावास व 2000/- रुपये दंड, दंडाची रक्कम न भरल्यास आनखी 2 महिने अतिरिक्त सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे…

मा. पोलीस अधिक्षक, गोंदिया श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक श्री. नित्यानंद झा,उपविभागीय पोलीस अधिकारी रोहीणी बानकर मॅडम, यांच्या मार्गदर्शखाली तपास अधिकारी पो. नि. सांडभोर पो. हवा. संजय चौव्हाण यांनी उत्कृष्ट तपास केला असुन पो. नि. पुरुषोत्तम अहेरकर, यांचे मार्गदर्शनात पो.शि. यादोराव कुर्वे यांनी न्यायालयीन कामकाज पाहीले….तसेच सदर गुन्ह्यात सरकारी अभियोक्ता म्हणून श्री. पुरुषोत्तम आगासे, यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली…

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट