आष्टा पोलीसांकडून सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक येथे चोरीचा प्रयत्न करणारा आरोपी गजाआड तसेच घडफोडीचे दोन गुन्ही उघड…

उपसंपादक – रणजित मस्के
सांगली ( आष्टा ) : – दि. १७/०२/२०२३ रोजी सायंकाळी ५.०० वा ते दि. १९/०२/२०२३ रोजीचे सकाळी ११.०० वा चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्यानं सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक शाखा आष्टा येथील बंद शटरचे दरवाज्याचे कुलूप तोडुन बँकेत आत प्रवेश करून तिजोरीचं लॉक हॅण्डल तोडुन चोरी करण्याचा प्रयत्न केलेबाबत आष्टा पोलीस ठाणेस गु.र.नं. ३६/२०२३, भा.दं.वि.सं. कलम ४५४, ४५७, ३८०, ५११ अन्यर्य
दि.१९/०२/२०२३ रोजी गुन्हा दाखल केला आहे.
सदर गुन्हयाचे गांभीर्य लक्षात घेता मा. पोलीस अधिक्षक सां. सांगली श्री. बसवराज तेली, मा. अपर पोलीस अधिक्षक सो. श्रीमती आँचल दलाल व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी साो. इस्लामपूर विभाग श्रीमती पदमा कदम यांचे मार्गदर्शनाखाली तपास करीत असतांना गोपनिय बातमीदार तसेच तांत्रिक तपासाव्दारे कसांसीने तपास करीत असतांना सदर चोरीचा प्रयत्न मल्लाप्पा कल्लाप्पा सुनार, रा. हंपी किड्स शाळेमार्ग, दुधगाव रोड, आष्टा याने केल्याच निष्पण झाल्यानं त्यास शिताफीने ताब्यात घेवुन त्याचेकडे कसून चौकशी केली असता त्याने दिनांक १९/०२/२०२३ रोजी शिक्षक बैंक आष्टा येथे चोरी करण्याचा प्रयत्न केला असल्याची कबुली दिली आहे तसेच त्यास अधिक विश्वासात घेवून त्याचेकडे तपास केला असता त्याने डिसेंबर २०२२ मध्ये कर्मवीर भाऊराव पाटील माध्यामिक शाळा, बागणी येथे रात्रीचे वेळेस शाळेतील दोन लॅपटॉप चोरी केले असल्याचं सांगितले. त्यावरून पोलीस ठाणेकडील अभिलेख पडताळता सदर चोरीबाबत आष्टा पोलीस टाणं गु.र.नं. ३५३/२०२६ भादंवि कलम ४५४, ४५७, ३८० प्रमाणे दि. ०३.१२.२०१२ रोजी गुन्हा दाखल आहे. सदर दोन्ही लॅपटॉप त्याचेकडुन जप्त करण्यात आलेले असून त्याने शिक्षक बैंक, आष्टा येथे चोरीचे प्रयत्नाचे वेळी वापरलेली हत्यारे कटावणी देखील जप्त करणेत आलेली आहे.

आष्टा पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक श्री. अजित सिद, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनमित राऊत, संपफा संजय सनदी, पोलीस हेडकॉन्स्टेबल अभिजित धनगर, नितीन पाटील, पोलीस नाईक अमोल शिंदे, पोलीस कॉन्स्टेबल सूरज थोरात, अभिजीत नायकवडी यांनी अत्यंत चिकाटीने व कौशल्यपूर्वक तपास करून सदरचे मालमत्तेविरुध्दचं दोन गुन्हे उघडकीस आणलेलं असून सदर आरोपीस दिनांक २३/०२/२०२३) रोजीपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजुर असुन सदर गुन्हयांचा तपास पोलीस नाईक अमोल शिंदे हे करीत आहेत अशी माहीती श्री.अजित सिद पोलीस निरीक्षक आष्टा पोलीस ठाणे यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com