महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचा ६१ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न…

प्रतिनिधी- महेश वैद्य
मुंबई:-महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघ व मुंबई सुवर्णकार संघाच्या विद्यमाने रविवार दिनांक ३१ मार्च २०२४ रोजी सकाळी ठीक ११ वाजता मुंबई सुवर्णकार संघ कार्यालय येथे महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचे कार्याध्यक्ष श्री.अदिप वेर्णेकर यांच्या अध्यक्षतेखाली सुवर्णकारांचे जेष्ठ नेते व मुंबई सुवर्णकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार श्री.मोहन म्हाप्रळकर यांच्या शुभहस्ते केक कापून साजरा करण्यात आला.



कार्यक्रमाच्या सुरुवातीला सुवर्णकारांच्या सर्व दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली.सर्व उपस्थितांनी महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाच्या ६१ व्या वर्धापन दिनाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी महाराष्ट्र प्रदेश सुवर्णकार संघाचे खजिनदार श्री.संजय पितळे,मुंबई सुवर्णकार संघाचे संयुक्त चिटणीस श्री रवींद्र देवरुखकर,सह खजिनदार श्री. सत्यविजय मोंडकर, सह चिटणीस श्री.विठ्ठल थाटोला ,श्री.सतिश वैद्य,कार्यकारणी सदस्य श्री मंगेश आचरेकर,श्री.अमोल नारकर,सभासद श्री.उदय पाटणकर,श्री.महेंद्र सागवेकर,श्री.शांताराम नारकर,श्री.महेंद्र लवेकर,श्री.शैलेश कारेकर,मिलन मैती,प्रदिप रॉय हे उपस्थित होते.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com