दारूच्या नशेत 58 वर्षीय इसमाने घेतला गळफास…

0
Spread the love

प्रतिनिधी-राकेश देशमुख

महाड: दारू पिऊन आत्महत्येच्या प्रमाणात वाढ,,महाड तालुक्यातील टेमघर येथील घटना

आज दिनांक 31 मार्च रोजी टेमघर येथे एका 58 वर्षीय इसमाने राहत्या घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की मयत राजेंद्र किसन कदम यांना दारूचे अति वेसण होते. दिनांक 28 मार्च रोजी मयत राजेंद्र किसन कदम हे गावातील ग्रामस्थांना आढळले त्यानंतर तीन दिवस मात्र त्यांचा शोध लागत नाही म्हणून तपास केला असता राजेंद्र कदम यांचा मृतदेह घरात गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये सापडला. राजेंद्र कदम यांनी प्लास्टिक केबलच्या साह्याने स्वतः आत्महत्या केली आहे. एमआयडीसी पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला. सदरचा मृत्यू देह बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आला असून महाड एमआयडीसी पोलीस ठाणे येथे या मृत्यूची आकस्मिक मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदीश गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर एडवळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक पांडुरंग शास्त्री हे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट