ठाणे पोलिस आयुक्तांच्याहस्ते एपीआय सुनील तारमळे पोलिस महासंचालक पदकाने सन्मानित…

0
Spread the love

महाराष्ट्र दिनी ठाणे पोलिस आयुक्त जय जीत सिंह यांच्याहस्ते पोलिस महासंचालक पदक प्रदान करून एपीआय सुनील तारमळे यांना सन्मानित करण्यात आले.

महाराष्ट्र पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्यावतीने पोलीस महासंचालक रजनिश सेठ यांचे “पोलीस महासंचालक पदक २०२३” ठाणे पोलिस आयुक्तालयातील मानपाडा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील तारमळे यांना जाहीर झाले आहे. महाराष्ट्र व कामगार दिनाचे औचित्य साधून ठाणे पोलिस आयुक्तालय मैदानावर आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ठाणे पोलिस आयुक्त जयजीत सिंह यांच्याहस्ते एपीआय तारमळे यांना पोलिस

महासंचालकांचे पदक प्रदान करून त्यांच्या कामगिरीचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी इतर वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. दरम्यान, एपीआय सुनील तारमळे यांनी यापूर्वी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयातील

पनवेल शहर, एपीएमसी पोलिस ठाणे व इतर विविध ठिकाणी कार्यरत असतांना आपल्या कार्याचा ठसा उमटविला असून ही परंपरा ठाणे पोलिस आयुक्तालयातही कायम राखण्याचा ते प्रयत्न करत आहेत.

WhatsApp Image 2023-05-03 at 1.15.29 PM
WhatsApp Image 2023-05-03 at 1.15.27 PM
WhatsApp Image 2023-05-03 at 1.15.27 PM (1)

उपसंपादक – रणजित मस्के

ठाणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट