ठाणे गुन्हे शाखे ५ च्या पथकाने १ कोटी ८३ लाखांचे हॅश ऑईल ड्रग्ज केले जप्त…

उपसंपादक-रणजित मस्के
ठाणे :– ठाणे : ठाणे गुन्हे शाखा ५ च्या पथकाने कारवायांचा धडका सुरूच ठेवला असून हॅश ऑईल ड्रग्जची मोठी कारवाई केली.
या कारवाईत १ लाख ३८ लाख रुपयांचे १ किलो ३८० ग्रॅम चरस (हॅश) ऑईल असे एकुण १ किलो ५०७ ग्रॅम चरस (हॅश) ऑईल जप्त केले आहे.
वागळे इस्टेट पोलीस स्टेशन येथे गु.रजि.नं. २९४/२०२२ कलम ८ (क), २० (ब), २९ एन.डी.पी. एस. अधिनियमान्वये दि.०७/०२/२०२४ रोजी गुन्हा दाखल असुन सदर गुन्ह्याचा अधिक तपास केला असता यापुर्वी अटक असलेला आरोपी नामे ऋषभ संजय भालेराव, वय २८ वर्षे, रा. शहापुर, ठाणे हा त्याचे सहकारी यांचेकडुन माल आणत असल्याचे निष्पन्न झाल्याने त्याआधारे साखळी शोध घेतला असता त्यास अंमली पदार्थ पुरविणारे/विक्री करणारे अभिजीत अविनाश भोईर (वय २९ वर्षे, रा. आनंदनगर, खर्डी, शहापुर ), पराग नारायण रेवंडकर (वय ३१ वर्षे, रा. नवापाडा, डोंबिवली पुर्व, ठाणे) यांना २० फेब्रुवारी २०२४ रोजी अटक केली होती.
या आरोपींकडून चरस व गांजा असा १ लाख १६ हजार रूपयांचा अंमली इतर मुद्देमाल असा एकुण १ लाख ४६ हजार १६० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
तपासादरम्यान पोलिसांनी मामा उर्फ सुरेंद्र बाबुराव अहिरे, (वय ५४ वर्षे), राजू हरिभाऊ जाधव (वय ४० वर्षे )दोघेही रा. मनमाड, ता. नांदगाव, जि. नाशिक यांना अटक केली.
आरोपी मामा उर्फ सुरेंद्र बाबुराव अहिरे, याच्याकडून १२ लाख ७० हजार ७०० रुपयांचे १२७ ग्रॅम चरस (हॅश) ऑईल व आरोपी राजू हरिभाऊ जाधव याच्याकडून १ लाख ३८ लाख रुपयांचे १ किलो ३८० ग्रॅम चरस (हॅश) ऑईल असे एकुण १ किलो ५०७ ग्रॅम चरस (हॅश) ऑईल जप्त केले आहे.
हे चारही आरोपी पोलीस कोठडीत अटक असुन जप्त केलेले चरस (हॅश) ऑईल हे कोठुन प्राप्त केले व कोणास विक्री करणार होते याबाबत अधिक तपास सुरू असुन चरस (हॅश) ऑईल हे सहज प्राप्त होत नसल्याने त्यादृष्टीने सखोल तपास सुरू आहे. सदर गुन्हयाचा तपास पो.उप निरी तुषार माने करीत आहेत.
ही कारवाई पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंजाबराव उगले, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) शिवराज पाटील व सहाय्यक पोलीस आयुक्त (शोध- १) निलेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा वागळे घटक-५, ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विकास घोडके, सहाय्यक पोलीस निरिक्षक श्री. भुषण शिंदे, सहाय्यक पोलीस निरिक्षक पल्लवी ढगे पाटील, सहाय्यक पोलीस निरिक्षक अविनाश महाजन, पो.उप निरी/सुनिल अहिरे, पोलीस हवालदार रोहीदास रावते, हवालदार शशिकांत नागपुरे, हवालदार सुनिल निकम, हवालदार जगदिश न्हावळदे, हवालदार संदिप शिंदे, हवालदार काटकर, हवालदार माधव वाघचौरे, पोलीस नाईक तेजस ठाणेकर, पोलीस नाईक उत्तम शेळके, महिला पोलीस हवालदार मोहिते, पोलीस अंमलदार यश यादव यांनी केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com