मेल व एक्सप्रेसमध्ये वृद्ध महिलांना लुटणारा ठाणे गुन्हे शाखा २ ने केला गजाआड…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

मुंबई:-मुंबई : मेल, एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या वयोवृद्ध महिलांचा सोन्याचा ऐवज चोणाऱ्या सराईत आरोपीला गजाआड केले. ही कारवाई ठाणे गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने केली. या कारवाईमुळे ४ गुन्ह्यांची उकल झाली असून, ४ लाख ९९ हजार ३३२ रूपयांचे १३७.७८० मि. ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

चंद्रावली सदाशिव शेट्टी (वय ६८ वर्ष, रा. टि. चकाला, अंधेरो, मुंबई) या २९ फेब्रुवारी रोजी उडपी रेल्वे स्टेशन येथून अप १२६२० मत्स्यगंधा एक्सप्रेसचे (Matsyagandha Express) बोगी नं. एस.८ ने लोकमान्य टिळक टर्मिनस येथे येण्याकरिता प्रवास करत होत्या. १ मार्च २०२४ रोजी सकाळी ०६.४५ वा सुमारास घाटकोपर रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी या गाडीची गती धीमी झाली. ही संधी साधून एका इसमाने शेट्टी यांचे मंगळसूत्र, सोन्याची चेन खेचून धावत्या गाडीतून उडी मारली.

या प्रकरणी कुर्ला लोहमार्ग पोलिसांनी (गु.र.नं. २६८/२०२४ कलम ३९२ भा.दं.वि) गुन्हा दाखल केला. अशाच प्रकारचे जबरी चोरीचे गुन्हे यापूर्वीही घडले होते. या गुन्ह्यांना आळा बसण्यासाठी तात्काळ आरोपींना अटक करण्याच्या सूचना मुंबई लोहमार्ग आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी गुन्हे शाखेच्या पथकांना दिले. त्यानुसार ठाणे यूनिट क्र. ०२ चे पथक या गुन्ह्यांचा समांतररित्या तपास करू लागले. तपासादरम्यान तांत्रिक माहितीचे विश्लेषण केले असता सराईत आरोपी सैफ असगर अली चौधरी याची माहिती पोलिसांना समजली. त्या माहितीच्या आधारे पनवेल रेल्वे स्थानकावर व ट्रॅकमध्ये सापळा लावून सैफ चौधरी (वय ३६ वर्षे, रा. लि. गाझीयाबाद, राज्य उत्तर प्रदेश) याच्या मुसक्या आवळण्यात आल्या. त्याची कसून चौकशी केली असता त्याने ४ प्रवाशांचा ऐवज चोरल्याची कबुली दिली.

या कारवाईमुळे कुर्ला लोहमार्ग पोलीस ठाणे (गु.र.नं. २७१/२०२४ कलम ३९२ भा.दं.वि.),पनवेल लोहमार्ग पोलीस ठाणे (गु.र.नं. ६१/२०२४ कलम ३९२ भा.दं. वि. आणि गु.र.न. ६२/२०२४ कलम ३९२ भा.दं. वि.) येथे दाखल असलेल्या गुन्ह्यांची उकल झाली.

ही कारवाई पोलीस आयुक्त, डॉ. रविंद्र शिसवे, मध्य परिमंडळचे उपायुक्त मनोज पाटील, एसीपी राजेंद्र रानमाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरशुद्दीन शेख, पोलीस उपनिरीक्षक अशोक होळकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन शेडगे, रविंद्र दरेकर, संदीप गायकवाड, हवालदार सतीश धायगुडे, अनिल खाडे, शशिकांत कुंभार, अंमलदार अमित बडेकर, राजेश कोळसे, गणेश माने, इम्रान शेख, हरिश संदानशिव, सुनिल मागाडे यांनी केली.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट