ठाणे ACB ची ठाणे येथील कोनगांव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक श्री. राजेश डोंगरे वरयशस्वी सापळा रचून कारवाई

ठाणे
सह संपादक- रणजित मस्के
➡ युनिट:- ठाणे
➡ तक्रारदार:- पुरुष, वय 23वर्षे
➡ आरोपी लोकसेवक राजेश केशवराव ड़ोंगरे वय-34,पद- पोलीस उप निरीक्षक, नेमणुक कोनगांव पोलीस स्टेशन,भिवंडी,ठाणे शहर वर्ग-2
➡ तक्रार प्राप्त:- दि. 20/02/2025
➡ लाच मागणी पडताळणीः- दि.22/02/2025
➡ लाचेची मागणी रक्कम तक्रारीनुसार
₹ 80,000/-तडजोडअंती रूपये ₹ 25000/-.
दि. 22/02/2025 रोजीचे पडताळणी मध्ये तडजोडीअंती 10,000/- लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न
➡ लाच स्वीकृती व हस्तगत रक्कम व दिनांक:- दि. 22/02/2025 रोजी 10,000/-रुपये स्वीकारले.
➡ थोडक्यात हकिकत:-
यातील तक्रारदार यांनी दि. 20/02/2025 रोजी दिलेल्या तक्रारीत तक्रारदार यांचेकडे लोकसेवक ड़ोंगरे यांनी स्वतःसाठी कोनगाव पोलीस स्टेशन येथे दाखल गुन्हा रजि नं 78/2025 भा. न्या. सं. कलम 109,118(1), 352 मध्ये यातील तक्रारदार यांना आरोपी न करणे करीता 80,000/- रु. व तडजोडी अंती 25,000/- लाचेच्या रकमेची मागणी केल्याची तक्रार प्राप्त झाली होती.
सदर तक्रररीच्या अनुषंगाने दि. 22/02/2025 रोजी करण्यात आलेल्या पडताळणी दरम्यान लोकसेवक राजेश डोंगरे पोउपनीरी कोनगाव पो स्टेशन यांनी तक्रारदार यांचे कडे तडजोडीअंती 10,000/-रु . लाचेच्या रकमेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.त्यानुसार दि.22/02/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कार्यवाही दरम्यान लोकसेवक डोंगरे यांनी तक्रारदार यांचेकडून मागणी केलेली लाचेची रक्कम पंच साक्षीदार यांचे समक्ष 10,000/-रु. तक्रारदार यांचेकडून लोकसेवक डोंगरे यांना लाच स्वीकारताना रंगेहात पकडून ताब्यात घेण्यात आले आहे.
लोकसेवक यांचेविरुध्द गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.
▶️ सापळा अधिकारी –
माधवी राजेकुंभार
पोलीस उप अधीक्षक
लाप्रवि ठाणे.
▶️ सापळा पथक –
1)पोहवा/6669 रुपेश पाटील 2)पोहवा/4344 तानाजी गायकवाड 3)मपोहवा/6731 गणपते
4)पोशिं / 7755 चालक आहीरे
▶️ मार्गदर्शन अधिकारी-
- मा. श्री. शिवराज पाटील, पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
- मा. श्री. संजय गोवीलकर, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
- मा. श्री. सुहास शिंदे, अपर पोलीस अधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, ठाणे परिक्षेत्र, ठाणे.
ठाणे जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमचेशी संपर्क साधावा.
अँटी करप्शन ब्यूरो, ठाणे कार्यालय दुरध्वनी – 022 2542 7979
/ टोल फ्रि क्रं. 1064
माधवी राजेकुंभार ,
पोलीस उप अधीक्षक ,