तेटघरच्या पोलीस पाटील साक्षी पालांडे यांना नव महाराष्ट्र राज्य गाव कामगार पोलीस पाटील संघटनेतर्फे नियुक्तीपत्र देऊन सन्मानित…

0
Spread the love

प्रतिनिधी-रेश्मा माने

पनवेल :तेटघरच्या पोलीस पाटील सौ.साक्षी चंद्रशेखर पालांडे यांची पनवेल येथे नुकत्याच पार पडलेल्या नव महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील संघटनेच्या मेळाव्यात रायगड जिल्हा महिला आघाडी आघाडी प्रमुख म्हणून संघटनेचे अध्यक्ष मा.पंढरीनाथ पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात कोकण पदवीधर मतदार संघाचे मा.आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

न्यु गावकामगार संघटना महाड अध्यक्ष श्री. संजय दत्तु सुर्वे किंजळोली बुद्रुक
डाॅ.अँड. महेंद्र पुंडलिक वानखेड महाड यांना सन्मानित

सौ.साक्षी पालांडे या उच्चशिक्षित असून कोरोना काळात त्यांनी त्यांच्या तेटघर येथील परिस्थिती अतिशय उत्तमरीतीने हाताळलेली असून गावपातळीवर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कर्तव्यदक्षपणाने चोख बजावले आहे आत्ताही ही एवढी मोठी जबाबदारी त्या समर्थपणे पार पाडून संघटनेने त्यांच्यावर टाकलेला विश्वास सार्थ ठरवतील असे वक्तव्य संस्थेचे अध्यक्ष पंढरीनाथ पाटील तसेच आमदार .बाळाराम पाटील यांनी करून त्यांच्या कार्यास भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

त्यांना मिळालेल्या या नियुक्तीमुळे समाजातील सर्व थरातून त्यांच्यावर अभिननंदनाचा वर्षाव होत आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

dipakbhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट