मंदिरातील चोरी घरफोडी करणारा आरोपी सुभाष केवट यास अटक करण्यात पालघर पोलीसांना यश…!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर
दि.२७/०२/२०२५ रोजी वाणगाव पोलीस ठाणे हद्दितील सामुद्रीमाता मंदिर, चिंचणी पिंपळनाका ता. डहाणू जि. पालघर येथील मंदिरात कोणीतरी अज्ञात चोरट्याने बंद सामुद्री माता मंदिराचे पाठिमागील दरवाज्याचा कोयंडा तोडुन आत प्रवेश करुन चांदिचा मुकुट व शंकर देवाची चांदिची मुर्ती, दानपेटीतील रोख रक्कम व हरीहरेश्वर मंदिराचे दान पेटीतील रोख रक्कम असा एकूण २,३५,०००/- रुपये किंमतीचा मुद्देमाल घरफोडी चोरी करुन चोरुन नेला आहे म्हणुन वाणगाव पोलीस ठाणे येथे । ०९/२०२५ बी.एन.एस २०२३ चे कलम ३३१ (४),३०५ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सदर गुन्ह्याचे गांभिर्य लक्षात घेऊन श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांनी पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व सपोनि/तुषार पाचपुते, प्रभारी अधिकारी वाणगाव पोलीस ठाणे यांना तपास पथक तयार करून योग्य त्या सुचना देवून मार्गदर्शन केले.
त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा, पालघर व वाणगाव पोलीस ठाणेचे संयुक्त पोलीस पथक तयार करण्यात आले. सदर पथकाने गुप्त बातमीदाराच्या सहायाने तसेच तांत्रीक पध्दतीन तपास करून संशयीत आरोपी सुभाष शितलप्रसाद केवट, वय ४२ वर्षे, रा. कुंदेवाडी, ता. निफाड, जि. नाशिक, मुळ रा. ग्राम पिपरीस, पो. महादेवा, ता. भदोही, जि. संत कबिरनगर राज्य उत्तरप्रदेश यास ताब्यात घेवून त्याचेकडे कसून चौकशी केली असता सदरचा गुन्हा केल्याचे त्याने कबुल केले आहे. सदर गुन्ह्यात वर नमुद आरोपीस अटक करून गुन्ह्यात गेलेला मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. गुन्ह्याचा अधिक तपास हा पोलीस उपनिरीक्षक भारत वनवे नेमणुक वाणगाव पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कामगिरी ही श्री. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विकास नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोनि/प्रदिप पाटील, स्थानिक गुन्हे शाखा, पालघर, सपोनि/तुषार पाचपुते, प्रभारी अधिकारी वाणगाव पोलीस ठाणे, पोउपनि/रविंद्र वानखेडे, पोउपनि/राठोड पोहवा/संदिप सरदार, पोहवा/राकेश पाटील, पोहवा/गायकवाड सर्व नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा, पालघर तसेच सफी/भुषण संखे, पोहवा/समिर संखे नेम. वाणगाव पोलीस ठाणे यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.