शिक्षक भरती मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य-उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर

दि 26 : जिल्ह्यामध्ये होणाऱ्या शिक्षक भरती मध्ये स्थानिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या राज्यस्तरीय अधिवेशनाचा शुभारंभ पालघर येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार डॉ.हेमंत सवरा, आमदार सर्वश्री राजेंद्र गावित, निरंजन डावखरे, माजी आमदार राजेश पाटील, राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या सदस्या वैदेही वाढाण, ज्येष्ठ पत्रकार प्रसन्न जोशी ,संघटनेचे प्रदेशाध्यक्ष जी . के थोरात , कार्याध्यक्ष नरसु पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पहेलगाम येथे पर्यटकावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ,गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेचीअत्यंत गंभीर दखल घेतली असून अतिरेक्यावर अशा पद्धतीने कारवाई करण्यात येईल की त्यांचा हा शेवटचा हल्ला असेल .या हल्ल्यामध्ये शहीद झालेल्या सर्व शहिदांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.
राज्य शासनाने शिक्षकांना अशैक्षणिक कामे न देण्याचा प्रयत्न केला असून हा भार बऱ्याच प्रमाणात कमी करण्यात आला आहे भविष्यातही आणखीन अशैक्षणिक कामाचा भार कमी करण्यात येईल .शिक्षकांची पेसा कायदा विषयक जी मागणी आहे त्याविषयी येणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले
शिक्षण महर्षी सोनोपंत दांडेकर यांच्यासारख्या शिक्षण महर्षीची पालघर ही भूमी आहे शिक्षण महर्षी तात्यासाहेब सुळे यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडीच्या अधिवेशनाला शिक्षकांशी संवाद साधण्यासाठी तसेच
आई-वडिलांनंतर नव्या पिढीला आकार देण्याचे काम शिक्षक करत असतात नव्या पिढीच्या शिल्पकारांचे स्वागत करण्यासाठी मी इथे आलो असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
शिक्षण महर्षी तात्यासाहेब सुळे यांची दूरदृष्टी असलेली संघटना शिक्षक पुढे नेत आहेत . शिक्षण महर्षी तात्यासाहेब सुळे यांनी शिक्षकाच्या सेवेचे साधन म्हणून आमदारकीकडे पाहिले होते.
समाजाला आणि देशाला मी काय दिले हा विचार शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मनात रुजवला पाहिजे असेही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी होणार

उद्योग मंत्री उदय सामंत

देशभक्तीची भावना रुजवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे माध्यमिक व प्राथमिक हे घटक देशभक्ती ची भावना निर्माण करू शकतात.देशभक्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करायची असेल तर शिक्षकांना अशैक्षणिक काम देऊ नये असे राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळे भविष्यात शिक्षकांचे अशैक्षणिक कामे कमी होणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

शिक्षकांच्या अडचणी व समस्या सोडविण्यासाठी शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्यासोबत शिक्षक संघटनांची लवकरच बैठक घेऊन समस्यांचे निराकरण करण्यात येणार असल्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट