सातारा पोलीसांकडून तासवडे टोल नाक्यावर सोन्या-चांदीच्या वस्तूंची तपासणीसाठी जप्ती..

उपसंपादक-रणजित मस्के
सातारा :-27 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी 17:15 वाजता कराड ते सातारा जाणाऱ्या रस्त्यावरील तासवडे टोल नाक्यावर MH 12 VF 3937 क्रमांकाची कुरिअर वाहतूक करणारी गाडी अडवण्यात आली. वाहनाच्या इनवाइसची तपासणी केल्यावर त्यात सोन्या-चांदीचे दागिने असल्याचे आढळले. या वस्तू इनवाइस प्रमाणे आहेत की नाही याची खात्री करण्यासाठी, सदर गाडी तळबीड पोलीस ठाण्यात सीसीटीव्ही निगराणीखाली सुरक्षित ठेवण्यात आली, ज्यामध्ये विविध तपासणी पथकांचे सहकार्य घेण्यात आले.


ही कारवाई FST पथक, GST अधिकारी, आयकर अधिकारी, कराड तहसीलदार आणि कराड नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांच्या संयुक्त सहकार्याने करण्यात आली. तपासणीमध्ये 9 किलो 390 ग्रॅम सोने आणि 60 किलो चांदी असल्याचे निष्पन्न झाले, ज्याची अंदाजे किंमत 7 कोटी 53 लाख रुपये आहे.
सध्या आयकर विभागाकडून इनवाइसची पडताळणी सुरू आहे. तोपर्यंत सोन्या-चांदीचे दागिने पोलीस संरक्षणाखाली सुरक्षितपणे वाहनात ठेवलेले आहेत. कराड उत्तर FST पथकाने या वाहनाची तळबीड पोलीस ठाण्यातून कराड कोषागारात सुरक्षितपणे नेण्याची जबाबदारी घेतली आहे, आणि योग्य त्या सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
तपासणी प्रक्रिया पूर्ण होताच पुढील माहिती दिली जाईल.अशी माहिती
सातारा पोलीसांकडून देण्यात आली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com