तासगाव पोलीस ठाणे हद्दीत गाडी अडवुन हत्यारासह १ कोटी १० लाखाची जबरी चोरी करणा-या टोळीचा पर्दाफाश, पाठलाग करुन शिताफीने मुद्देमाल व हत्यारासह केले ०३ आरोपी जेरबद …

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

सांगली(तासगाव ): अपराध क्र आणि कलम गुरनं १४५/२०२३ भादवि कलम ३९४,३४

फिर्यादी नाव

महेश शितलदास केवलाणी वय ४६ रा. पिंपळगाव ता.निफाड जि.नाशिक
सध्या रा.गणेश कॉलनी, तासगाव
दि.२८.०३.२०२३ रोजी सायकाळी ०७.१५ वा ०७.३० वा सुमारास
ता. तासगाव

माहिती कशी प्राप्त झाली

पोना / सागर टिंगरे
स्वागुअ, शाखा सांगली
कारवाई करणारे अधिकारी आणि अमलदार मा. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम तासगाव विभाग यांचे मार्गदर्शनाखाली

१) पोलीस निरीक्षक सतिश शिंदे २) पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे
३) सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे ४) सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत निशानदार सागर टिंगरे, संदीप गुरव, सागर लवटे, मच्छिद्र बर्डे, अनिल कोळेकर, संदीप पाटील, संतोष गळवे, विक्रम खोत, चेतन महाजन, प्रशांत माळी, सुनिल लोखंडे, अमोल ऐदाळे, प्रकाश पाटील, कैप्टन गुंडवाडे, अजय बेद्रे,
गौतम कांबळे, सचिन कनप, दिपक गड्ढे, गजानन घस्ते, सुधीर गोरे.

आरोपीचे नाव पत्ता

१) नितीन खंडु यलमार, वय २२ रा मतकुणकी, ता. तासगाव.

२) विकास मारुती पाटील, वय ३२ रा मतकुणकी, ता. तासगावं. – ३) अजित राजेंद्र पाटील, वय २२ रा मतकुणकी, ता. तासगाई,

अटक दिनांक व वेळ

दिनांक २९.०३.२०१३ रोजी गुन्हयातील जप्त मुद्देमाल

1) 1,09,00,000/- रु त्यामध्ये विविध दराच्या चलनी नोटा

2) 30,000/- रू किमतीची एक स्प्लेंडर मोटार सायकल

3) 200/- रू किंमतीची एक धारदार तलवार.

1.09,30,200/- एकुण (एक कोटी नऊ लाख तीस हजार दोनशे रु. फक्त)

गुन्हयाची थोडक्यात हकीकत

दिनांक 28.32023 रोजी सायंकाळी 07.15 या से 07.30 वा. चे दरम्यान फिर्यादी नामे महेश शितलदास केवलाणी, वय-46 रा. पिंपळगाव ता. निफाड जि. नाशिक सध्या रा. गणेश कॉलनी, तासगाव ता. तासगाव (द्राक्ष व्यापारी) व सोबत त्यांचे दिवाणजी राजेंद्र माळी, चालक आकाश चव्हाण असे फिर्यादी यांचे स्कॉर्पिओ गाडी क्र. एम एच 15 जीएफ 0215 मधुन तासगाव मधील शेतक-यांच्या द्राक्ष बाग ठरवुन तसेच मार्च एंडीग असलेने शेतक-यांना त्यांचेकडून घेतलेल्या द्राक्ष मालाचे रोख स्वरुपात पैसे अदा करण्यासाठी सांगली येथुन रोख रक्कम घेऊन तासगाव शहरात येत असताना अज्ञात 04 इसमांनी तासगाव शहरातील गणेश कॉलनीकडे जाणारे रोडवर फिर्यादीचे स्कॉर्पिओ गाडी क्र. एम एच 15 जीएफ 0215 समोर अचानक मोटार सायकल आडवी लावून गाडीच्या ड्रायव्हर बाजुचे काचेवर हात मारला असता चालक आकाश चव्हाण याने गाडीची काच उघडली त्यावेळी त्यापैकी एका इसमाने तलवारी सारखे दिसणारे हत्याराने धाक दाखवुन गाडीची चावी कावुन घेतली व गाडीच्या मधल्या सीटवर ठेवलेल्या पैशाच्या बँगेवर झडप मारून ती बॅग जबरदस्तीने घेऊन जात असताना त्यांना फियांदी व त्यांचे दिवाणजी यांनी प्रतिकार करीत असताना फिर्यादी व त्यांचे दिवाणजी यांना स्कॉर्पिओ गाडीमधुन खाली पाडुन लायांबुक्यानी मारहाण करुन गाडीत ठेवलेली 1,10,00,000/- रुपये (एक कोटी दहा लाख रु.) भरलेली पिशवी अज्ञात 04 इसमानी जबरदस्तीने घेऊन गेलेबाबत तासगाव पोलीस ठाणे येथे वरीलप्रमाणे जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मा. पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली, उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे मॅडम, तासगाव विभाग यांनी तासगाव शहरात घडलेला जबरी चोरीचा गुन्हा उघडकीस आणणेबाबत पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांना सुचना दिल्या. त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, सांगली यांनी सपोनि संदीप शिंदे व सपोनि प्रशांत निशानदार यांची दोन वेगवेगळी पथके तयार करुन गुन्हा घडले ठिकाणी भेट देवुन गुन्हा उघडकीस आणणेबाबत सुचना दिल्या होत्या.

त्याप्रमाणे सपोनि संदीप शिंदे यांचे पथकातील पोलीस नाईक सागर टिंगरे यांना त्यांचे खास गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, तासगाव शहरात स्कॉर्पिओ गाडीस मोटार सायकल आडवी मारून पैशाची बेंग लुटण्याचा गुन्हा हा नितीन पलमार, रा. मतकुणकी ता. तासगावं व त्याचे इतर साथीदारांनी मिळून केला असुन नितीन यलमार व त्याचे साथीदार हे लुटलेल्या पैशासह शिकोबा डोंगराच्या पायथ्याला, मणेराजुरी येथे निर्जनस्थळी थांबले असलेबाबत खात्रीलायक माहिती मिळाली. त्याप्रमाणे सपोनि संदीप शिंदे व त्यांचे पथकाने तात्काळ बातमीतील नमुद ठिकाणी जावून छापा मारला असता, पळून जाण्याचे प्रयत्नात असलेल्या व हत्यार सोबत असलेल्या संशयितांना शिताफीने पाठलाग करुन पंचासमक्ष तावेत घेतले.

सपोनि संदीप शिंदे व पथकाने त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) नितीन खंडु यलमार, वय 22 रा, मतकुणकी ता. तासगाव 2) विकास मारुती पाटील, वय 32 रा मतकुणकी ता. तासगाव 3) अजित राजेंद्र पाटील, वय 22 रा, मतकुणकी ता. तासगाव अशी सागितली. त्यावेळी पंचासमक्ष त्यांचे कब्जातील पिशवी चेक केली असता त्यामध्ये मोठया प्रमाणात रोख रक्कम असल्याचे दिसुन आल्याने त्यांना सदर रक्कमेबाबत विचारले असता, त्यांनी सदर रक्कम ही काल रात्री तासगाव शहरात एका द्राक्ष व्यापा-यास मारहाण करुन लुटुन आणली असल्याचे सांगीतले. त्यांची पंचासमक्ष झडती घेतली असता त्यांचे कब्जात वरील गुन्हयात जबरीने काढून घेतली रोख रक्कम 1 कोटी 09 लाख रुपये, गुन्हा करण्यासाठी वापरण्यात आलेली 30,000/- रुपये किंमतीचा एक स्प्लेंडर मोटार सायकल, गुन्हयात वापरलेले 200/- रू किंमतीचे धारदार तलवारी सारखे हत्यार असा एकूण 1,09,30,200/- रु. (एक कोटी नऊ लाख तीस हजार दोनशे रु.) किंमतीचा मुद्देमाल सपोनि संदीप शिंदे यांनी पंचासमक्ष सविस्तर पंचनामा करुन ताब्यात घेतला आहे.

आरोपी याने गुन्हा करतेवेळी वापरलेल्या स्प्लेंडर मोटार सायकल बाबत सपोनि संदीप शिंदे यांनी अधिक माहिती घेतली असता सदरची मोटार सायकल ही आरोपी नामे नितीन खंड यलमार, वय २२ रा मतकुणकी ता. तासगाव याने इस्लामपूर पोलीस ठाणे हद्दीतील किल्ले मछिंद्रगड येथून चोरली असल्याचे कबुल केले आहे. सदर बाबत इस्लामपूर पोलीस ठाणे येथे गुरनं. 421/2022 भादंवि कलम 379 प्रमाणे गुन्हा दाखल असुन सदर गुन्हा देखील उघडकीस आला आहे.

आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी तासगाव पोलीस ठाणे येथे जमा करण्यात आला आहे. पुढील तपास अश्विनी शेडगे मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी, तासगावं या करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट