अनैतिक मानवी व्यापार करणारे महिला आरोपीवर तारापूर पोलीसांनी कारवाई करुन एका पिडीत महिलेची केली सुटका..

प्रतिनिधी- मंगेश उईके
तारापूर :-दिनांक १४.०६.२०२४ रोजी श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, बोईसर यांना गोपनीय बातमीदाराकडुन माहीती प्राप्त झाली की, तारापुर पोलीस ठाणे हद्दीत कुरगांव रॉयल गार्डन, रुम क्रमांक १०२, ए विंग या सदनिकामध्ये एक महिला अवैधरित्या वेश्या व्यवसाय चालवित असल्याची माहीती मिळाली.
सदर माहीती प्राप्त होताच श्री बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांचे मार्गदर्शनाखाली श्री. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर विभाग, बोईसर व तारापुर पोलीस ठाणेचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांचेसह सदर ठिकाण छापा कारवाई केली असता नमुद ठिकाणाहुन १ पिडीत महिला हिची सुटका करण्यात आलेली असुन १ महिला आरोपीत हिचे विरुध्द तारापुर पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं.४०/२०२४ भादवि कलम ३७० सह अनैतिक मानवी व्यापार (प्रतिबंध) अधिनियम सन १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
सदरची कामगिरी मा. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर, मा. पंकज शिरसाट, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, मा. विकास नाईक, उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर यांचे मार्गदर्शनाखाली व सुचनांप्रमाणे सपोनि/सागर कावळे, प्रभारी अधिकारी, तारापुर पोलीस ठाणे, संदीप कहाळे, सहा. पोलीस निरीक्षक तथा वाचक उप विभागीय पोलीस अधिकारी, बोईसर यांचे कार्यालय, पोउनि/गोरखनाथ राठोड, पोहवा/तांबडा मपोहवा/भुसारा, मपोना/टोपले, मपोना/चौधरी, पोना/अंभिरे, पोअं/वसावे पोअं/कुवरा, पोअं/मेहेरे, पोअं/खेडकर, पोअं/धानिवरे सर्व नेमणुक तारापुर पोलीस ठाणे यांनी केलेली असुन सदर गुन्हयाचा पुढील तपास सहा. पोलीस निरीक्षक सागर कावळे, नेम. तारापुर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com