तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून 14 मे रोजी राष्ट्रीय रंगीत तालीम

0
Spread the love

उपसंपादक-मंगेश उईके

पालघर दि 29 : राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 14 मे 2025 रोजी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय रंगीत तालीम आयोजित करण्यात आलेली आहे.


सदर राष्ट्रीय रंगीत तालिमेच्या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ. इंदू राणी जाखड यांच्या अध्यक्षतेखाली पूर्वतयारी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे वरिष्ठ सल्लागार
मेजर जनरल अजय कुमार वर्मा, राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे चंद्रकेतू शर्मा,
अपर पोलीस अधीक्षक विनायक नरळे , तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाचे मुख्य अधीक्षक रणधीर कुमार ,जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विवेकानंद कदम तसेच आरोग्य, रेल्वे, एसटी महामंडळ, महावितरण, mpcb, मुख्याधिकारी, वन विभाग, परिवहन, भारत संचार निगम लि. मधील अधिकारी उपस्थित होते.
रंगीत तालीम करण्याचा उद्देश म्हणजे तारापूर अणुऊर्जा प्रकल्पात काही अपघात झाला तर रेडिएशनमुळे लोक बाधित होऊ नये त्यासाठी त्यांना सुरक्षित स्थळी हलविण्याच्या दृष्टिकोनातून जिल्हा प्रशासनाच्या सर्व एजन्सीकडून तात्काळ मदत मिळणे तसेच प्रत्येक विभागात त्यांची जबाबदारी माहिती करून देणे व त्यासंदर्भात कार्य करणे तत्परता असणे आवश्यक आहे. पूर्वी दर दोन वर्षांनी अशा प्रकारचा अभ्यास केला जात होता परंतु 2021 पासून तर तीन वर्षांनी आयसीसीआर अभ्यास केला जात आहे. या वर्षापासून दरवर्षी रंगीत तालीम आयोजित करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांचे निर्देश आहेत. त्यानुषंगाने दिनांक 6 मे रोजी दिल्ली येथून ऑनलाईन ओरिएंटेशन बैठक होणार आहे. त्या नंतर 13 मे रोजी टेबल टॉप एक्सरसाइज होणार आहे. आणि दिनांक 14 मे 2025 रोजी रंगीत तालीम होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट