महाड मध्ये मुंबई गोवा महामार्गावर टेंभुर्णी येथे केमिकल घेऊन जाणारा टॅन्कर रोडवर पलटी..

उपसंपादक- राकेश देशमुख
महाड:– दिनांक 28.04.2024 रोजी 06.30 वाजताच्या सुमारास ट्रेलर (टँकर) क्रमांक MH .12.GT.4203 वरील चालक अनंत सर्जेराव भुसारे वय 45 वर्ष राहणार दाभा, तालुका मंगलुरपिर जिल्हा वाशिम हा टँकर मध्ये CRUDE SULFATE TERFAINTINE नावाचे केमिकल घेऊन मुंबई ते प्रिवी कंपनी महाड एमआयडीसी तालुका महाड येथे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 जात असताना मौजे टेंभुर्णी तालुका महाड येथे अपघात ठिकाणी आले वेळी चालक अनंत सर्जेराव भुसारे यांचा टँकर वरील ताबा सुटल्याने ट्रेलर (टँकर) रोडवर पलटी होऊन अपघात झालेला आहे.
अपघातात कोणासही काही एक दुखापत झालेले नाही.
केलेली कार्यवाही –
घटनास्थळी तात्काळ पोहोचून बघ्यांची गर्दी दूर केली. टँकर मधील केमिकल बाबत माहिती घेतली. अपघात ग्रस्त टँकरचे दोन्ही बाजूस बॅरिकेटिंग केली. महाड शहर पोलीस ठाणे यांना अपघात बाबत माहिती दिली. म्युचल एड रिस्पॉन्स टीम महाड एमआयडीसी, अग्निशमन दल महाड एमआयडीसी, अग्निशमन दल महाड नगर परिषद, तसेच प्रिवी कंपनी महाड एमआयडीसी यांचे एक्सपर्ट टीम यांना घटनेबाबत माहिती दिली. स्थानिक 02 हायड्रा क्रेन सर्विस यांना घटनास्थळी बोलवले. हायड्रा क्रेनच्या मदतीने ट्रेलर रोडच्या बाजूला काढण्यात आलेला आहे. परंतु ट्रेलर वरील केमिकलने भरलेला टँकर हा दोन हायड्रा क्रेन उचलण्यास अवजड असल्याने माणगाव येथून आणखी दोन हायड्रा क्रेन बोलून सदरचा केमिकलने भरलेला टँकर सावधगिरीने बाजूला करण्याची दक्षता घेतलेली आहे. कार्यवाही समाप्त होताच रिपोर्ट मा.हुजुरांस सादर करीत आहोत.
माहिती मिळाली – 06.35
रवाना वेळ – 06.36
पोहोचलो – 06.42
कार्यवाही चालू आहे.
अशी माहिती श्री
प्रवीण धडे
पोलिस उपनिरीक्षक
महामार्ग पोलिस केंद्र महाड यांनी दिली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com