तलवारीने केक कापुन वाढदिवस साजरा करणारा स्थानिक गुन्हे शाखा जालनाच्या ताब्यात..!

जालना :
सह संपादक – रणजित मस्के
जालना जिल्हयात अवैध धारदार शस्त्रे, तलवार बाळगणारे इसमांची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत मा. पोलीस अधिक्षक श्री. अजयकुमार बन्सल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री पंकज जाधव व पथकास सूचना दिल्या होत्या
श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा जालना यांनी स्थागुशाचे पथक तयार करुन कारवाई करण्याबाबत मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने दिनांक 20/03/2025 रोजी माहिती मिळाली की, इसम नामे वैजिनाथ बंडुआप्पा परळकर, वय-34 वर्ष, रा.पोखरी सिदखेड, ता.जि. जालना याने त्याचा वाढदिवसाच्या दिवशी दोन तलवारीने केक कापून लोकांमध्ये दहशत निर्माण केली. त्यानुषंगाने आरोपोतास ताब्यात घेवुन पोखरी सिदखेड, ता.जि.जालना येथुन दिनांक 20/03/2025 रोजी रु.5000/- किमतीच्या दोन धारदार तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत. नमुद आरोपी विरुध्द पोलीस ठाणे तालुका जालना येथे सरकारतर्फ पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री. अजय कुमार बन्सल, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना श्री. अनंत कुलकणी यांचे मार्गदर्शनाखाली श्री. पंकज जाधव, पोलीस निरीक्षक स्थागुशा जालना, सहा पोलीस निरीक्षक श्री योगेश उबाळे, पोलीस उप निरीक्षक राजेंद्र वाघ, पोलीस अंमलदार भाऊराव गायके, कैलास खाडे, दिपक घुगे, किशोर पुंगळे स्था.गु.शा. जालना यांनी केली आहे.