तलवार घेवुन दहशत माजविणारा हददपार आरोपी एम आय डी सी पोलीस स्टेशनच्या शोध पथकाच्या ताब्यात….

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

जळगाव : एम आय डी सी पोस्टे सिसिटीएनएस नं. 145/2023 मु पो अॅक्ट कलम-142 सह आर्म अॅक्ट कलम-4/25 तसेच मु पो अधिनियम 37 (1) (3) चे उल्लंधन 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हांत मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो यांना मिळालेल्या गुप्त बातमीवरुन हददपार आरोपी दिनकर उर्फ पिण्या रोहीदस चव्हाण, वय-22 रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव हा रामदेवबाबा मंदीर, सुप्रीम कॉलनी, जळगाव येथे हातात तलवार घेवुन दहशत माजवित हददपार आदेशाचे तसेच मा. जिल्हाधिकारी सो जळगाव यांचे कडील आदेशाचे उल्लंघन करतांना मिळुन आला म्हणुन त्यास दिनांक 14.0.3.2023 रोजी 18.30 वाजता ताब्यात घेवुन रितसर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक श्री एम राजकुमार सो. तसेच मा. अपर पोलीस अधिक्षक श्री चंद्रकांत गवळी सो., व मा. उपविभागिय पोलीस अधिकारी श्री संदीप गावित सो. व मा. पोलीस निरीक्षक श्री जयपाल हिरे सो., यांच्या मार्गदर्शनखाली पो उप निरी आनंदसिंग पाटील, पोहेकॉ गणेश शीरसाळे, पोना विकास सातदिवे, किशोर पाटील, योगेश बारी, पोकॉ किरण पाटील, नाना तायडे अशांनी केली असुन गुन्हांचा पुढील तपास पोना विकास सातदिवे करीत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट