रोहा भालगांव येथील तलाटी संतोष चांदोरकर हे १० हजार लाच प्रकरणी तिसऱ्यांदा एसीबीच्या जाळ्यात…

उपसंपादक-राकेश देशमुख
रोहा :
यापूर्वीही महाडमध्ये संतोष चांदोरकर यांच्यावर दोनवेळा एसीबीने कारवाई केली होती..?
रोहा:-तालुक्यातील भालगावचे तलाठी संतोष चांदोरकर यांनी लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करून त्यांना ताब्यात घेतले.
तक्रारदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार यांना गट क्रमांक 783 क्षेत्र 01-99-00 या जमिनीचे फेरफार नोंद मंजूर होऊन उतारा देण्याकरिता तलाठी संतोष चांदोरकर यांनी तक्रारदार यांच्याकडे दिनांक 30/05/2023 रोजी 10,000/- रुपये लाचेची मागणी केली होती.
तलाठयाने लाच स्वीकारण्याची तयारी दर्शवली म्हणून बुधवार दिनांक 26 जुलै 2023 रोजी रोहा पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात येऊन त्याला ताब्यात घेण्यात आले.
याआधी महाड शहरात या तलाठ्या विरोधात दोनवेळा लाचप्रकरणी कारवाई झाली होती अशी माहिती लाचलुचपत विभागाने पत्रकारांना दिली.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सुनील लोखंडे,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल घेरडीकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाडावे,पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे,स.फौ.अरुण करकरे, विनोद जाधव, पोलीस हवालदार महेश पाटील, कौस्तुभ मगर, जितेंद्र पाटील,महिला पोलीस नाईक स्वप्नाली पाटील यांनी केली.
दरम्यान भरमसाठ पगार असताना देखील तलाठ्याने १० हजाराची लाच मागितल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com