तलासरी पोलीस ठाणे यांचेकडून अवैधरित्या तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कारवाई..!

उपसंपादक : मंगेश उईके
पालघर.

पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करणे बाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.
दिनांक ०६/०७/२०२५ रोजी तलासरी पोलीसांना अवैधरित्या गुटख्याची वाहतुक होत असल्याची गोपणीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार तलासरी हिवाळ पाडा, तास्कंद हॉटेलसमोर, मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर, मुंबईकडे जाणाऱ्या बाजूवर ता. तलासरी जि. पालघर येथे दि.०७/०७/२०२५ रोजी पहाटे ०३.२० वाजताचे सुमारास नाकाबंदी लावून वाहने चेक करत असताना एक क्रेटा कार क्र. MH-02-EU-6632 हिस थांबण्याचा इशारा केला असता सदर कार चालक गाडी सोडून अंधाराचा फायदा घेवून पळून गेला. नमूद गाडी चेक केली असता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत असलेला एकूण ४,०५,९६४/- रूपये किंमतीचा तंबाखूजन्य (गुटखा) पदार्थ मिळून आला. गाडीसह एकूण १६,०५,९६४/- रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून अज्ञात आरोपीविरुध्द तलासरी पोलीस ठाणे येथे ११६/२०२५ भा. न्या. सं. कलम १२३,२२३,२७४,२७५ सह अन्न सुरक्षा आणि मानके अधि. २००६ कलम २६ (२) (अ), २७ (२) (ई), ३० (२) सह मा. अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य यांचेकडील अधिसुचना शुक्रवार जुलै १२,२०२४/आषाढ २१ शके १९४६ दि.१२/०७/२०२४ रेग्युलेशन २०,२,३,४ ऑफ फुड सेप्टी अॅन्ड स्टेडड-२०११, ३,१,७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्याचा पुढिल तपास हा पोउपनि/जी.एस. कांबळे, नेमणुक तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.
सदरची कारवाई श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती अंकिता कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड, तलासरी पोलीस ठाणे, पोउपनि/जी.एस. कांबळे, श्रेपोउपनि/जे.एम.उमतोल, श्रेपोउपनि/ए.एन. गाँजारी, चालक सफौ/जयंत गडग, पोहवा/५२५ रविंद्र भगत, पोहवा/६९१ मनोज भोये, पोअं/इंद्रभान लंबे, पोअं/योगेश मुंडे सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.