तलासरी पोलीस ठाणे यांचेकडून अवैधरित्या दारूची वाहतुक करणाऱ्या आरोपीवर कारवाई.

0
Spread the love

उपसंपादक : मंगेश उईके

पालघर.
पोलीस अधीक्षक पालघर श्री. यतिश देशमुख यांनी पालघर जिल्हयातील अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करणे बाबत सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी व स्थानिक गुन्हे शाखा, पालघर यांना सक्त सुचना दिलेल्या आहेत.

दिनांक २४/०६/२०२५ रोजी पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड, तलातरी पोलीस ठाणे यांना बोलेरो मोटार पिकअप क्र. MH-48/CQ-1891 मध्ये अवैधरित्या दारूची वाहतुक होत असल्याची गोनणीय माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार मौजे उथपा, नवापाडा गावचे हद्दीत, उधवा-तलासरी रोडवर ता. तलासरी जि. पालघर येथे नाकाबंदी लावून बोलेरो मोटार पिकअप क्र. MH-48/CQ-1891 हिस थांबवून यातील चालक नामे रत्नेश लालजी उपाध्याय, वय ३९ वर्षे, रा. रूम नं. ४३३५, गांगडेपाडा, जय अंबे हॉटेल जवळ, धानीव पेल्हार, ता. वसई, जि. पालघर मुळ रा. कंतीरामपुर, पो. सुरीयावा, पोलीस ठाणे-सुरीयावा, ता. ग्यानपुर, जि. भदोही, राज्य उत्तर प्रदेश यास विचारपुस करून गाडीमध्ये चेक केले असता दादरा नगर हवेली येथून उधवा-तलासरी रोडने गुजरात राज्यामध्ये अवैधरित्या दारूची वाहतुक करीत अत्तताना मिळून आला. नमूद आरोपीकडून गाडीसह एकूण १३,२४,०००/- रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून त्याचेविरुध्द तलासरी पोलीस ठाणे येथे ता १८/२०२५ महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ) (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यात नमूद आरोपीस अटक करून मा. न्यायदंडाधिकारी, डहाणु कोर्ट यांचेकडे हजर केले असता त्यांनी आरोपीस ३ दिवसाची पोलीस कोठडी मंजुर केलेली आहे. नमूद गुन्ह्याचा पुढिल तपास हा सफौ / हिरामण खोटरे, नेम. तलासरी पोलीस ठाणे हे करीत आहेत.

सदरची कारवाई ही श्री. यतिश देशमुख, पोलीस अधीक्षक, पालघर, श्री. विनायक नरळे, अपर पोलीस अधीक्षक, पालघर, श्रीमती अंकिता कणसे, उपविभागीय पोलीस अधिकारी, डहाणु विभाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री. अजय गोरड, तलासरी पोलीस ठाणे, सपोनि/हेमंत देवरे, पोउपनि /जयराम उमतोल, सफी/हिरामण खोटरे, पोहवा/प्रविण चौरे, पोअं/संदिप चौधरी सर्व नेमणुक तलासरी पोलीस ठाणे यांनी केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट