ताडदेव मध्ये पोलीस काॅलनीत घराचे स्लॅब कोसळून 12 वर्षाचा मुलगा जबर जखमी…

प्रतिनिधी-रणजित मस्के
मुंबई: जनतेचे संरक्षण करणाऱ्या
पोलीसांच्या घराची सुरक्षा कोण करणार …?


हेच जर पोलीस परिवाराच्या डोक्यात पडले असते तर
हे चित्र बघून डोळ्यात पाणी येते पोलीस पण माणसे आहेत हो त्याना पण जगण्याचा अधिकार आहे .
पोलीस परिवाराचा जीव गेल्यावर त्याच्याकडे बघणार आहात का ? पोलीस जनतेचे रक्षण करतोय तर त्यांच्या परिवाराचा जीव चालला आहे पोलीस लोकांच्या घराचे रक्षण करतोय इथे पोलीसांचा परीवार धोक्यात आहे .
मुंबई ताडदेव पोलीस कॉलनी बिल्डिंग नंबर चार मध्ये राहणारे देबे कुटुंबिय थोडक्यात वाचले, पहाटे चार वाजता पोलीस देबे कुटुंबियांच्या घरातला स्लॅब कोसळला त्यात त्यांचा १२ वर्षांचा मुलगा प्रथमेश हा जबर जखमी झाला .त्याच्या जीवाचे बरे वाईट झाले तर काय करायचे ? तरी सरकारनी पोलीसांना राहायला घर तरी सुरक्षित आणि चांगले द्या 24 तास त्यांच्या कडून कर्तव्य करून घ्या, खायला भाकरी देऊ नका पण त्यांचे कुटुंब सुरक्षित राहील एवढी तरी काळजी घ्या .
असे आव्हान राहुल अर्जुनराव दूबाले
संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्र पोलीस बॉईज संघटना
तथा महाराष्ट्र शासन गृह विभाग पोलीस निराकरण समन्वय समिती यानी केले आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com