तासपते ६ जुगाऱ्यांना ३५२०० /- रूपयांचा मुद्देमालासह गोंदिया स्थानिक पोलीसांनी घेतले ताब्यात…

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :-➖ आगामी सन उत्सवांच्या पार्श्वभूमीवर गोंदिया जिल्हयात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये, जिल्ह्यात शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलीस अधीक्षक श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांनी जिल्ह्यांतील सर्व सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

➖ या अनुषंगाने जिल्ह्यात अवैध धंदयाविरूद्ध धाड मोहीम राबवून प्रभावी कारवाई च्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी मिळालेल्या गुप्त माहीती च्या आधारे दिनांक 11-08-2024 रोजी 17.45 वा. ते 18.35 च्या सुमारास मौजा-कोहका- सेजगांव जंगल परीसरात धाड कारवाई करून तासपत्यावर पैशांची हारजीत लावून जुगार खेळ खेळणाऱ्या 06 इसमांना सापळा रचून शिताफीने ताब्यात घेण्यात आले…..जुगार खेळणाऱ्या इसमांच्या ताब्यातून रोख रक्कम 14,200/- रुपये, 02 मोबाईल हँडसेट व ताडपत्री असा एकुण 35,200/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.*
जुगार खेळ खेळणारे आरोपी नामे-*
1) निकेश उर्फ लाला रामदास ब्राम्हणकर, वय 32 वर्षे, रा. सुंदरनगर, गोंदिया.
2) शुभम रामचंद्र बागडे, वय 23 वर्षे, रा. सुंदरनगर गोंदिया
3) प्रवेश नरेंद्र मेश्राम, वय 24 वर्षे, रा. कुडवा, गोंदिया
4) सुमित जयंत रामटेके, वय 26 वर्षे, रा. कृष्णपुरा वार्ड, गोंदिया
5) विकेश शिवनाथ मालाधरी, वय 36 वर्षे, रा. रामनगर, गोंदिया
6) सुरेंद्र धुरन रणगिरे, वय 30 वर्षे, रा. मुंडीपार, गोंदिया
यांना ताब्यात घेण्यात आले असून नमूद आरोपींविरोधात पो. ठाणे- गंगाझरी येथे कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
➖ सदरची कारवाई पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश सूचना आदेशाप्रमाणे पो.नि. दिनेश लबडे, स्था.गु.शा. यांचे मार्गदर्शनात पो.हवा. सोमेंद्र तुरकर, प्रकाश गायधने, दुर्गेश तिवारी, इंद्रजित बिसेन, सुबोध बिसेन, पो.शि. दुर्गेश पाटील यांनी केली.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com