स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड व पुणे रेल्वे स्टेशन परिसरामधुन प्रवाशांचे मोबाईल चोरी करणाऱ्याचोरट्यांना स्वारगेट पोलीसांनी केले जेरबंद

0
Spread the love

सह संपादक – रणजित मस्के

पुणे

स्वारगेट पोलीस ठाणे हद्दीतील स्वारगेट एस टी स्टैंड व पी एम पी एम एल बस स्टॉप येथे चोरीच्या घटना अधुन मधुन घडत असल्याने श्री. युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी स्वारगेट पोलीस स्टेशन कडील पोलीस उपनिरीक्षक अशोक पाटील, पोना ठोंबरे, पोशि कुडाळकर यांना सुचना देवुन सदर भागात सकाळी गर्दीचे वेळी गुन्हे प्रतिबंधक गस्त करणेबाबत आदेशित केले होते. त्यावरुन दि.२८/०४/२०२५ रोजी सकाळी ०६/०० वा. चे सुमारास सदर पथक गस्तीवर असताना दोन इसम स्वारगेट पी.एम.पी.एम.एल बस स्टॉप येथे प्रवाशांच्या गर्दीत संशयीत रित्या वारंवार फिरत असल्याचे दिसुन आले त्यांचे हालचालीवरुन त्याचेवर अधिक संशय बळावल्याने सदर पथकाने त्यांना हटकले असता ते पळुन जावु लागल्याने त्यांना स्टाफचे मदतीने जागीच ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी त्यांचे नाव व पत्ता १) तुषार अचिंता लोखंडे वय २० वर्षे रा. गल्ली नं-३ पाटील इस्टेट शिवाजीनगर, मोबीन शेखच्या किराणादुकाना जवळ शिवाजीनगर पुणे. २) गणेश संजय पोळके वय २३ वर्षे रा.गल्ली नं-३ पाटील इस्टेट शिवाजीनगर, मोबीन शेखच्या किराणा दुकाना जवळ शिवाजीनगर पुणे असे असल्याचे सांगितले. त्यानंतर इसम नामे तुषार लोखंडे याचे ताब्यातील सॅकची पडताळणी केली असता त्यामध्ये वेगवेगळ्या वर्णनाचे व वेगवेगळ्या कंपन्यांचे एकुण ०६ मोबाईल फोन मिळुन आले. सदर मोबाईल फोनबाबत त्यांचेकडे विचारणा केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिल्याने त्यांना अधिक चौकशीकामी स्वारगेट पोलीस ठाणे येथे आणले. तद्नंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे व तपास पथकातील पो/हवा. अश्रुबा मोराळे व पो/शि प्रशांत टोणपे व इतर अंमलदार यांनी सदर आरोपींकडे कसुन चौकशी केली असता त्यांचे ताब्यात मिळालेले ०६ मोबाईल फोन व आणखीन ०६ मोबाईल फोन असे एकुण १२ मोबाईल फोन हे स्वारगेट बस स्टॅन्ड परिसर, पुणे स्टेशन व शिवाजीनगर बस स्टॅन्ड येथुन गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे चोरी केले असल्याचे सांगितले. त्यावरुन स्वारगेट पोलीस स्टेशनकडील अभिलेखाची पडताळणी केली असता त्यातील ०१ मोबाईल फोन बाबत स्वारगेट पोलीस स्टेशन गु.रजि.नं- ११५/२०२५ भारतीय न्याय संहीता कलम ३०३ (२) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले. सदर आरोपींकडुन तपासा दरम्यान एकुण १,८०,०००/- रुपये किंमतीचे वेगवेगळ्या वर्णनाचे व कंपन्यांचे एकुण १२ मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहेत.

सदरची कामगिरी ही मा.श्री. अमितेश कुमार साो, पोलीस आयुक्त, पुणे शहर, मा.श्री. रंजनकुमार शर्मा सो, सह-आयुक्त सो, पुणे शहर, मा.श्री. प्रविणकुमार पाटील साो. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर, मा. स्मार्तना पाटील साो, पोलीस उप-आयुक्त, परिमंडळ २, पुणे शहर, मा. राहुल आवारे साो, सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे, स्वारगेट पोलीस स्टेशन पुणे शहर, श्री. विकास भारमळ, पोलीस निरीक्षक (गुन्हे) स्वारगेट पोलीस स्टेशन यांच्या आदेशान्वये तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस उप-निरीक्षक अशोक पाटील, पो.हवा. अश्रुबा मोराळे, पो/हवा. हर्षल शिंदे, पो/ना. ठोंबरे, पो/अं. कुडाळकर, प्रशांत टोणपे, सुजय पवार, दिपक खंदाड, फिरोज शेख, हनुमंत दुधे, रमेश चव्हाण, संदीप घुले, यांनी एकत्र मिळुन केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट