स्वारगेट रेप प्रकरणातील गाडीच्या वकिलाचा अपहरण नाही तर दारू पिण्याचा व्हिडिओ आला समोर..!

सह संपादक- रणजित मस्के
पुणे ;
इसम नामे - साहिल बबन डोंगरे वय- 25, धंदा- वकिली व समाजकार्य (वंचित बहुजन आघाडी पदाधिकारी)
पत्ता- धनंजय कामटे यांच्या घरासमोर, लक्ष्मी नगर, फुरसुंगी, पुणे यांनी आज 18/03/25 रोजी सकाळी हडपसर पोलीस स्टेशन येथे येऊन सांगितले की , त्यांना पहाटेच्या सुमारास काही इसमानी गाडीतळ परिसरातून जबरदस्तीने गाडीत बसवून मारहाण करून दिवे घाट येथे सोडून दिले.
त्यांना डोळ्याजवळ, पायाला व शरीरावर किरकोळ जखमा दिसत असून त्यांना नेमके कुठून व कधी गाडीत बसवून नेले याबाबत व्यवस्थित माहिती सांगता येतनाहीत.
अधिक माहिती घेतली असता ते रात्री दारू पिऊन होते व मोटर सायकल वर स्लीप होऊन पडले असल्याची शक्यता वाटते.
हडपसर पोलिस स्टेशन येथे ते हजर होताच , त्यांना उपचारासाठी पोलिस अंमलदार देऊन ससून रुग्णालय येथे पाठविले आहे.
अधिक माहिती घेऊन पुढील कारवाई करत आहोत. अशी माहीती
संजय मोगले
वरीष्ठ पोलिस निरीक्षक
हडपसर पोलीस स्टेशन यानी दिली.