स्वारगेट पोलीसानी ५५ घरफोड्या करणाऱ्या गणेश काठेवाडे टोळीकडून ८६० ग्रा. सोने,१५० हिरे केले जप्त..

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

पुणे : घरफोडी करणा-या अट्टल टोळीस जेरबंद करून त्यांचेकडून ८६० ग्रॅम सोन्याचे दागिने, १५० हिरे, साडेतीन किलो चांदी, ०२ पिस्तोल, ०५ जिवंत राऊंड, ०१ दुचाकी वाहन, घरफोडी करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य असा एकुण रु. ८०,०००,००/- रू.चा. मुद्देमाल हस्तगत १९/१२/२०२४ रोजी स्वारगेट पो.स्टे. पुणे शहर येथे दाखल गुन्हा रजि. नंबर ५२६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३०५, ३३१ (३) या गुन्ह्याचा तपास करीत असताना स्वारगेट पो.स्टे. कडील पोलीस अंमलदार यांनी पुणे शहरातील साधारण १६०० ते १७०० सीसीटीव्ही कॅमेरे चेक करुन त्या मधून मिळालेल्या संशयीत अस्पष्ट छबीच्या अनुषंगाने तपास करताना स्वारगेट पो.स्टे. कडील पोलीस अंमलदार रफिक नदाफ, शंकर संपते, सागर केकाण व दिनेश भांदुर्गे यांना त्यांचे गोपनीय बातमीदार मार्फत माहिती प्राप्त झाली की, रेकॉर्ड वरील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार ‘नामे गणेश मारुती काठेवाडे, वय ३७ वर्षे रा. मु.पो. मुखेड, जि. नांदेड याने सदर घरफोडी केली असून तो त्याची ओळख लपवून उंड्री परिसरामध्ये वावरत आहे अशी खात्रीशीर माहिती मिळाली.

सदर मिळलेली बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे यांना कळविली असता, त्यांनी बातमीचे गांभीर्य ओळखून कारवाई करण्यास सांगुन त्याप्रमाणे नियोजनबध्दरीत्या उंड्री परिसरामध्ये गणेश काठेवाडे याचा शोध घेवून त्यास चौकशी कामी स्वारगेट पो.स्टे. येथे आणून त्याच्याकडे केलेल्या चौकशी मध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याने त्यास दाखल गुन्ह्यामध्ये दि. ०१/०१/२०२५ रोजी अटक करण्यात आली आहे.

दाखल गुन्ह्याचे अनुषंगाने आरोपी गणेश काठेवाडे याचेकडे सखोल तपास करता त्याने झोमॅटो डिलीव्हरी बॉय म्हणून सोसायट्यांमध्ये जावून रेखी करून पुणे शहर पोलीस आयुक्तालयामधील विविध पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये एकूण १४ घरफोड्या केल्या असून स्वारगेट एस.टी. स्टॅण्ड येथे ०७ चो-या केल्याचे सांगितले. तसेच चोरी केलेले दागिणे त्याने मोक्का गुन्ह्यातून जामिनावर सुटलेल्या तसेच खून व खूनाचा प्रयत्न केलेला रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे सुरेश बबन पवार, वय ३५ वर्षे रा. संभाजीनगर, बालाजीनगर, पुणे याचेकडे दिले असल्याचे सांगितले. यास्तव दाखल गुन्ह्यामध्ये सुरेश पवार याला अटक करण्यात आलेली आहे. सुरेश पवार याचेकडे, गणेश काठेवाडे याने दिलेले चोरीचे सोने चांदी दागिणे त्याने पुणे शहरातील विविध सोनार यांचेकडे ठेवून वेगवेगळी कारणे सांगून
त्याबदल्यामध्ये त्यांच्याकडून पैसे स्विकारल्याचे सांगितले. सदर व्यवहारामध्ये, ऑर्डर प्रमाणे सोने तयार करुन विक्री करणारा व्यवसायिक नामे निमसिंग ऊर्फ अजय करणसिंग राजपूत (नथवाला) वय ३९ वर्षे वाने मध्यस्थी केल्याचे निष्पन्न झाल्याने मिमसिंग राजपूत यास दाखल गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आलेली आहे.

अटक मुदतीमध्ये आरोपींकडे केले चौकशीमध्ये आरोपी नामे गणेश काठेवाडे हा मोक्का गुन्ह्यामधून जामिनावर सुटलेला असून त्याचेवर पुणे शहर पोलीस आयुक्तालय व पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व पुणे ग्रामीण हद्दीमध्ये ५५ पेक्षा अधिक घरफोडी, चोरी, वाहन चोरी, दरोडा, एटीएम रॉबरी, जबरी चोरी इत्यादी गुन्हे दाखल असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्याचप्रमाणे पोलीस सीसीटीव्ही चेक करुन आपल्या पर्यंत पोहचू नयेत यासाठी तो घरफोडी करण्याच्या ठिकाणी येताना सुमारे ४० ते ५० कि.मी. चा प्रवास करुन येवून घरफोडी करुन तसेब जाताना पुन्हा ४० ते ५० कि.मी. चा प्रवास छोट्या-छोट्या गल्ल्यांमधून करुन जात असे. तसेच घरफोडी करुन जाताना व घरफोडी करण्यासाठी येताना स्वतःची ओळख लपविण्यासाठी विविध जॅकेट, केसांचा विग, टोपी परिधान करून वेशभूषा बदलत असे. त्यामधून जरी चुकून सीसीटीव्ही कॅमे-यामध्ये त्याची छवी आलीच तर पोलीसांचा तांत्रीक विश्लेषनातून तपास भरकटावा यासाठी मोबाईल फोन कानाला लावून बोलण्याची अॅक्टींग करत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

दाखल गुन्ह्यातील दुसरा अटक आरोपी व गणेश काठेवाडे याचा साथिदार नामे सुरेश बबन पवार हा अंबरवेड, गवळीवाडा, ता. मुळशी, जि. पुणे या गावचा माजी उपसरपंच असून त्याचेवर खून तसेच खूनाबा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल असून सध्या तो मोक्का गुन्ह्यातून जामिनावर आहे. दाखल गुन्ह्यातील अटक आरोपी नामे गणेश काठेवाडे याने केलेल्या घरफोडी मधील दागिण्यांचा उपास करत असताना, त्यासंदर्भात सुरेश पवार याचेकडे तपास करता त्याचेकडे ०२ पिस्टल व ०५ जिवंत राऊंड मिळून आल्याने ते जप्त करण्यात आले आहेत.

अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून दाखल गुन्ह्यातील तसेच पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील विविध पो. स्टे अंतर्गत झालेल्या घरफोड्यातील व चोरीतील एकूण ८६० ग्रॅम सोन्याचे दागिणे, १५० हिरे, ३.५ किलो चांदी, १ दुधाकी वाहन, ०२ पिस्तोल, ०५ जिवंत राऊंड, व घरफोडी करण्यासाठी वापरण्यात आलेले कटावणी, लोखंडी पक्कड, स्कु ड्रायव्हर इ. मिळून साधारण ८० लाख रु.चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त पुणे शहर श्री. अमितेश कुमार, मा. पोलीस सह आयुक्त पुणे श्री. रंजनकुमार शर्मा, मा. अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक पुणे श्री प्रविणकुमार पाटील, मा. पोलीस उप-आयुक्त परि.२. पुणे श्रीमती स्मार्तना पाटील, मा. सहा. पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग श्री. राहुल आवारे, यांच्या मार्गदर्शन व अधिपत्याखाली स्वारगेट पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. युवराज नांद्रे, सहा. पोलीस निरीक्षक, राहुल कोलंबिकर, पोलीस उप-निरीक्षक रविंद्र कस्पटे, पोलीस अंमलदार संजय भापकर, श्रीधर पाटील, नाना भांदुर्गे, कुंदन शिंदे, सुधीर इंगळे, सचिन तनपुरे, शंकर संपते, सागर केकाण, सतिश कुंभार, रफिक नदाफ, राहुल तांबे, शरद गोरे, रमेश चव्हाण, विक्रम सावंत, उज्वला थोरात, पोर्णिमा गायकवाड, सुनिता खामगळ, सुरेखा कांबळे व पोलीस मित्र दिनेश परीहार यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट