स्वारगेट बस स्थानकात मोबाईल हिसकावणारा जाळ्यात

0
Spread the love

उपसंपादक – रणजित मस्के

पुणे :- नागरिकांच्या सतर्कतेने चोरट्याला रंगेहात पकडण्यात यश, पोलिसांकडून १२ मोबाईल जप्त

स्वारगेट बस स्थानकात प्रवाशांचे मोबाईल हिसकावून नेणाऱ्यास नागरिकांच्या सतर्कतेमुळे पकडण्यात न पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन तो मोबाईलची चोरी करत होता. अंकुश अशोक कराड (वय ३९, रा. ली. ता. पाथर्डी, जि. र अहमदनगर) असे अटक करण्यात त आलेल्याचे नाव आहे. ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्थना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक अशोक इंदलकर उपनिरीक्षक अशोक व येवले व त्यांच्या पथकाने केली आहे.

गेल्या काही दिवसांपासून स्वारगेट परिसर विशेषतः पीएमपीचे बस स्टॉप तसेच एसटी

बस स्थानकाच्या आवारात मोबाईल तसेच महिलांच्या गळ्यातील व हातातील दागिने आणि पर्समधील मौल्यवान वस्तू चोरणाऱ्या टोळ्यांनी चांगलाच उच्छाद घातला आहे. या घटनांत प्रचंड वाढ देखील झाली आहे.

पळालेल्या चोरट्याला पकडले यापाश्वंभूमीवर स्वारगेट पोलिसांनी या भागात गस्त देखील ठेवली असून, एसटी स्थानकात सतत पोलिसांचे पेट्रोलिंग केले जात आहे. परंतु या घटना काही केल्या थांबत नसल्याचे चित्र आहे. दरम्यान, सीन

दिवसांपूर्वी एका प्रवाशाच्या खिशातील मोबाईल घेऊन चोरट्याने चोरला अन् तेथून पळ काढला. पण हा प्रकार त्या प्रवाशाच्या नातेवाईकांनी पाहिला. त्यांनी लागलीच आरडाओरडा केला व चोरचोर म्हणून आरडाओरडा केला. चोरट्याचा पाठलाग देखील केला. त्याचेवळी एसटी स्थानकात असलेल्या पोलीस अमलदारांनी धाव घेत पळालेल्या चोरट्याला पकडले. त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल चौकशी सुरू केल्यानंतर त्याच्याकडून तब्बल १२ मोबाईल मिळून आले आहेत. ते सर्व चोरीचे असल्याचे समोर आले असून, आता त्या मोबाईल मालकांचा पोलीस शोध घेत आहेत. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट