सातारा जिल्ह्यात स्वराज्य प्रबोधन अभियानाचे आआयोजन संपन्न…

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा : – पोलीस अधीक्षक श्री समीर शेख भा.पो.से. यांचे संकल्पनेतुन व अपर पोलीस अधीक्षक श्रीमती आँचल दलाल भा.पो.से. यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा पोलीस दलामार्फत “स्वराज्य प्रबोधन अभियान सुरु करण्यात आले असुन स्वराज्य प्रबोधन अभियानामध्ये सायबर क्राईम ऑनलाइन होणारी आर्थिक फसवणुक, अफवामुळे होणारे गैरसमज, सोशल मिडीया (व्हॉटसअप, इन्स्टाग्राम, फेसबुक इ.) माध्यमाद्वारे लोकांच्या भावना दुखावुन धार्मिक तेढ निर्माण होणारे संदेश पसरविणे, सोशल माध्यमाद्वारे होणारी छळवणुक याबाबत बचावासाठी लोकांना माहिती देवून जनजागृती करुन जनमाणसांना सावध करण्यासाठी सदरचा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सातारा जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे हद्दीतील शाळा, कॉलेज, बस स्टैन्ड बाजारपेठा, लोकांचे रहदारीचे ठिकाणी चारचाकी वाहनावर एलसीडीव्दारे विविध समाज प्रबोधनपर चित्रफिती दाखवुन सर्व सामान्य जनतेमध्ये सोशल मिडीया वापर, ऑनलाइन फसवणुक, अफवामुळे होणारे गैरसमज, सोशल माध्यमाद्वारे होणारी छळवणुक इत्यादीबाबत जागरुकता वाढविण्याचा स्वराज्य प्रबोधन अभियानाचा मुख्य उद्देश आहे.

दिनांक २१/१०/२०२३ रोजी स्वराज्य प्रबोधन अभियानामध्ये एक चारचाकी वाहन एलसीडी स्क्रिनसह सातारा जिल्हयामध्ये समाज प्रबोधनासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. समिर शेख यांनी हिरवा झेंडा दाखवुन रवाना केले. त्यावेळी, मा. पो. उपअधीक्षक (गृह), श्री. के. एन. पाटील व सातारा पोलीस दलातील अधिकारी व पोलीस अंमलदार उपस्थित होते.


ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com