संशयीत इसमाकडून चोरी केलेली ६० हजार रुपये किमतीची फायबर ऑप्टीकल केबल करीता वापरले जाणारे प्लायसिंग मशीन हस्तगत..

उपसंपादक – रणजित मस्के
सातारा :– श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा, श्री.बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, बाई विभाग वाई यांनी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, महाबळेश्वर पोलीस ठाणे यांनी पोलीस उप. निरीक्षक इनामदार यांचे अधिपत्याखाली एक पथक तयार करून महाबळेश्वर पोलीस ठाणे येथे दाखल झालेले चोरीचे गुन्हे उघड करण्याच्या सुचना दिल्या.
दिनांक १३/०१/२०२४ रोजी रात्री मौजे नगरपालीका हौसिंग सोसायटी, महाबळेश्वर ता. महाबळेश्वर येथुन फिर्यादी संदीप शंकर कुंभारदरे रा.डॉ. साबणे रोड, महाबळेश्वर ता महाबळेश्वर यांचे वायफाय कंट्रोल रुम मधुन फ्युजिकोरा कंपनीचे एफएसएम -६० एस मॉडेलचे फायबर ऑप्टीकल केबल करीता वापरले जाणारे प्लायसिंग मशीन अज्ञात चोरट्यांनी चोरी केल्याची तक्रार महाबळेश्वर पोलीस ठाणे गुरनं. ०५/२०२४ भादंवि कलम ४५४,४५७,३८० अन्वये नोंद झाली. त्यांनतर नमूद तपास पथकाने तांत्रिक माहिती व साक्षीदार यांच्याकडे केलेल्या तपासाच्या आधारे पुणे येथुन दोन संशवीत इसमांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सदरची चोरी केली नसल्याचं सांगितले, त्यांनतर नमूद संशयीत इसमांना अटक करून त्यांना मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, महाबळेश्वर यांचेकडे हजर करुन ०३ दिवस पोलीस कोठडी रिमांड मंजुर करून घेऊन आरोपीकडे कौशल्यपुर्ण तपास केलेनंतर त्यांनी सदरची चोरी केली असल्याची कबुली देवुन नमूद चोरी केलेली मशीन पूणे येथून जप्त करुन सदरचा चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे.
श्री. समीर शेख, पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल, अपर पोलीस अधीक्षक, सातारा,
श्री. बाळासाहेब भालचीम, उपविभागीय पोलीस अधिकारी, बाई विभाग वाई यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक यशवंत नलावडे, पोलीस उप. निरीक्षक रौफ इनामदार, पोहवा १०८४ संतोष शेलार, पोहवा /२२१० प्रमोद निकम, पोकों/१३०१ नवनाथ शिंदे यांनी सदरची कारवाई केलेली आहे. तरी महाबळेश्वर पोलीस ठाणे सातारा यांचेकडुन नागरीकांना त्यांचे निवास्थानी/ कार्यालय/ गोडावुन / याठिकाणी चोरी व घरफोडीचे प्रकार होवु नये यासाठी सीसीटीव्ही, सेन्सर सायरन (अलार्म) लावणेबाबत आवाहन करणेत येत आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com