पालघर मध्ये मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांसाठी 23 जानेवारी ते 31 जानेवारी पर्यंत सर्वेक्षण-गोविंद बोडके ( जिल्हाधिकारी )

प्रतिनिधी- मंगेश उईके
पालघर:- सर्वेक्षणासाठी 3932 प्रगणक तर 299 पर्यवेक्षक यांची नियुक्ती जिल्हाधिकारी गोविंद बोडके
पालघर दि. 23 : महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येणार आहे. शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमार्फत दिनांक 23 जानेवारी 2024 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये घरोघरी सर्वेक्षण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी सांगितले.
सर्वेक्षणा बाबत माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले त्यावेळी जिल्हाधिकारी श्री.बोडके बोलत होते.यावेळी उपजिल्हाधिकारी अपर्णा सोमाणी -आरोलकर,उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर,तहसीलदार डॉ.स्वाती घोगडे तसेच पत्रकार उपस्थित होते.
नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आयोगामार्फत सर्वेक्षणासाठी ओळखपत्र उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच सर्वेक्षणासाठी खास अत्याधुनिक सॉप्टवेअर (अॅप) तयार करण्यात आले आहे.
तालुका निहाय पर्यवेक्षक पुढीलप्रमाणे : पालघर 61, वसई 56, डहाणू 78, वाडा 27, तलासरी 38, विक्रमगड 13, जव्हार 17, मोखाडा 9. तालुका निहाय पर्यवेक्षकांची संख्या 299.
तालुका निहाय प्रगणक पुढीलप्रमाणे : पालघर 905, वसई 525, डहाणू 1166, वाडा 381, तलासरी 391, विक्रमगड 195, जव्हार 237, मोखाडा 132. एकुण तालुका निहाय प्रगणकांची संख्या 3932.
पालघर जिल्हयातील 8 तालुक्यासाठी नोडल ऑफिसर म्हणजेच तहसिलदार तसेच मास्टर ट्रेनर यांचे प्रशिक्षण दि. 20 व 21 जानेवारी रोजी पुर्ण झाले असून तालुकास्तरीय प्रगणक यांचे प्रशिक्षण दि. 22 जानेवारी रोजी पूर्ण झाले असल्याचे जिल्हाधिकारी श्री.बोडके यांनी सांगितले.


त्याअनुषंगाने पालघर जिल्हयामध्ये सदर सर्वेक्षणाची अंमलबजावणी योग्यरित्या होण्यसाठी गावोगावी जाऊन दवंडी देऊन लोकांना सदर सर्वेक्षण कालावधी मध्ये घरी राहणेबाबत सुचना तसेच सर्वेक्षण करणाऱ्या प्रगणकाना सहाय्य करण्यचे आवाहान करण्यात आले असून त्याबाबतची सुचना ग्रामपंचायत/तलाठी कार्यालयामध्ये प्रसिध्द करण्याच्या सुचना देण्यात आल्या असल्याचे जिल्हाधिकारी श्री.बोडके यांनी सांगितले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com