नियत वयोमानाने सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदार यांचे निरोप सत्कार कार्यक्रम संपन्न..

0
Spread the love

सह संपादक- रणजित मस्के

गोंदिया

      आज दिनांक - 04/03/2025 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे फेब्रुवारी / 2025 मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी अंमलदार - 

1) सहायक पोलीस उप-निरीक्षक- श्री. गौरीशंकर बुधलाल कटरे ,

2) सहायक पोलीस उप-निरीक्षक- श्री. झामसींग किरसान,

3) सहायक पोलीस उप-निरीक्षक- श्री. अंकुश हरी हटवार,

4) सहायक पोलीस उप-निरीक्षक- श्री. मनोहर प्यारेलाल अंबुले ,

5) पोलीस हवालदार- श्री. उमेशचंद्र रामचंद्र कोल्हारे

       यांचे निरोप सत्कार समारंभ कार्यक्रमावेळी पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे यांचे शुभ हस्ते त्यांना शाल, श्रीफळ, झाडाची रोपटे, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, सुभेच्छापत्र, स्मृतीचिन्ह, भेट वस्तु देवुन त्यांचे सत्कार करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील  भावी आयुष्याच्या वाटचालीकरिता शुभेच्छ्या देण्यात आल्या.

सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. गोरख भामरे, तसेच प्रभारी पोलीस उप-अधिक्षक (गृह) श्री रामेश्वर पिपरेवार, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन पोलीस निरीक्षक, श्री. रामेश्वर पिपरेवार, यांनी केले. तर सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील, श्री. रामेश्वर पिपरेवार, पोहवा राजु डोंगरे, राज वैद्य, यांनी कार्यवाही पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट