पोलीस अधीक्षक, श्री. निखील पिंगळे, अप्पर पोलीस अधिक्षक, श्री. अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली “पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत” अतिदुर्गम भागातील शेतकरी बांधवांना भात पिकावर “फवारणी शेफ्टी कीट” चे वाटप, सशस्त्र दूरक्षेत्र पिपरियाचा उपक्रम…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

 ⏩ पोलीस अधीक्षक, श्री. निखील पिंगळे, यांचे संकल्पनेतून, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री. अशोक बनकर,कॅम्प देवरी  उपविभागीय पोलीस अधिकारी आमगांव, श्री. संकेत देवळेकर यांचे मार्गदर्शनाखाली ठाणेदार पो. ठाणे सालेकसा, श्री. बाबासाहेब बोरसे, यांचे सहयोगाने सशस्त्र पोलीस दूरक्षेत्र पिपरिया, अंतर्गत पोलीस दादालोरा खिडकी योजनेच्या माध्यमातून  अतिसंवेदनशील,अतिदुर्गम नक्षलग्रस्त आदिवासी भागातील जनतेच्या हिता करीता विविध प्रकारचे लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात येत आहेत.

           त्या अनुषंगाने आज दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी " पोलीस दादालोरा खिडकी योजनेअंतर्गत " नक्षल प्रभावित अतिदुर्गम भागातील आदिवासी शेतकरी बांधवासाठी " भात पिकावर पडणारी किड तसेच पिकावरील रोग व त्यावरील उपाय यांकरिता फवारणीसाठी लागणारे सेफ्टी कीटचे वाटप असा मार्गदर्शनपर कार्यक्रम आयोजित करून घेण्यात आले. 

      सदरचे कार्यक्रमात श्री. शुभम निनावे, डेपुटी टेरिटोरायल मॅनेजर, गोंदीया यांनी पिपरीया परिसरातील शेतकरी बांधवांना धान (भात). पिकावर पडणारी किड,  लागणारा रोग जसे की-- मांवा, खोडकीडा, तिरपा आणी त्यावर उपाययोजना याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले......... श्री.  अरविंद नागरे  सर, टेरीटोरीयल मॅनेजर,भंडारा यांनी शेतकरी बांधवांना फवारणी करताना काय.. काय खबरदारी घेतली पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले. व एन.ए. सी. एल ( नागार्जुना अॅग्री केमीकल लिमीटेड). हैद्राबाद यांचे वतिने साधारण 100 शेतकरी बांधवांना शेत पिकावर फवारणी करतांना वापरण्यासाठी सेफटी किटचे वाटप करण्यात आले. सदर सेफ्टी किट मध्ये - अँप्रोन, मास्क, चश्मा व हँडग्लोजचा समावेश आहे. 

        सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. बाबासाहेब बोरसे, ठाणेदार पो. ठाणे सालेकसा यानी शेतकरी बांधवांना उत्पादक वाटप केलेल्या किटचा फवारणी करताना योग्य वापर करुन आपले व आपल्या परिवाराची,  कुटुंबाची सुरक्षा करावी असे आवाहन केले. 

        सदर कार्यकमाचे प्रास्तावीक सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया येथील प्रभारी अधिकारी-- पोउपनि एकनाथ डक, यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन पोउपनि संयमाळगे यांनी केले. सदर कार्यक्रमात पिपरिया गावचे सरपंच अनिल कुमार सोयाम, सरोज परतेती तसेच पिपरिया गावांतील जवळपास दीडशे च्या वार शेतकरी बांधव महिला- पुरूष मोठ्या संख्येने उपस्थित राहून मर्गदर्शनाचा लाभ घेतला.

        सदरचा कार्यक्रम मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनात श्री. संकेत देवळेकर,  उपविभागीय पोलीस अधिकारी आमगांव, श्री. बाबासाहेब बोरसे,ठाणेदार पो. ठाणे सालेकसा यांचे सहयोगाने सशस्त्र दूरक्षेत्र पिपरिया येथील प्रभारी अधिकारी पो.उप.नि एकनाथ डक, संतोष माने पोलीस अंमलदार अजय खोब्रागडे, आशिष येसुर, पुरजलाल मच्छिरके, चुत्रीलाल भोवते, पोना. सुरेंद्र बरईकर, विकास माने. पो. अंमलदार महेंद्र उके, आत्माराम कोरे, बळीराम कराड, रामदास चिकने, धनिराम चौधरी, शैलेश पटले, बाबुराव मौजे , राजेश मंडावी यांचे सर्वांचे परिश्रम व सहकार्याने पार पडला.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः

मोबा.नं. 9920601001

info@surakshapolicetimes.com

diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट