पोलीस अधीक्षक, श्री. निखिल पिंगळे, यांचे हस्ते सेवानिवृत्त पोलीस अधिकारी/अंमलदार यांचा सत्कार व निरोप सभारंभ कार्यक्रमाचे आयोजन

उपसंपादक-रणजित मस्के
गोंदिया :- दिनांक- 30/06 /2023 रोजी पोलीस अधीक्षक कार्यालय, गोंदिया येथील कॉन्फरन्स हॉल मध्ये माहे- जुन 2023 मध्ये गोंदिया जिल्हयाचे आस्थापनेवरील नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी- अंमलदार –
1) श्रेणी पोलीस उप-निरीक्षक, श्री. दिनेश कुमार माधोप्रसाद तिवारी ,
2) सहाय्यक पोलीस उप- निरीक्षक श्री. अशोक काशीराम राऊत
3)पोलीस हवालदार नाजुक राजाराम नंदेश्वर यांचे निरोप, सत्कार सभारंभाचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.



सदर आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे यांनी त्यांचे शुभहस्ते नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेले पोलीस अधिकारी अंमलदार यांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, सेवानिवृत्त प्रमाणपत्र, ओळखपत्र, शुभेच्छापत्र देवून सत्कार केला तसेच त्यांचे पुढील भावी आयुष्याकरीता शुभेच्छया दिल्या.
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, प्रभारी पोलीस उप- अधिक्षक (गृह). श्रीमती नंदिनी चानपुरकर, तसेच पोलीस अधिकारी/अंमलदार उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सूत्र संचालन पोलीस निरीक्षक, तथा अति.कार्य. पोलीस उप-अधिक्षक (गृह), श्रीमतो नंदिनी चानपुरकर यांनी केले.तर सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्याकरीता कल्याण शाखा येथील, पोहवा राजु डोंगरे, राजू वैद्य यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com