पोलीस अधीक्षक श्री.निखिल पिंगळे, अप्पर पोलीस अधीक्षक, श्री.अशोक बनकर, यांचे मार्गदर्शनाखाली गोंदिया जिल्हा पोलीसांना उपयुक्त अश्या सर्वसमावेशक जिल्हयाच्या भौगोलिक परिस्थितीची अचुक अद्यावत माहितीचे नकाशे तयार…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

     🪷 गोंदिया जिल्हा पोलीसांना उपयुक्त होईल असे सर्वसमावेशक  अद्यावत सूचीबद्ध अचूक माहिती असलेले नकाशे  उपविभाग निहाय व सर्व पोलीस स्टेशन निहाय तयार करण्यात आलेले आहेत. आणि यामुळे जिल्ह्यांतील कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी निश्चितच मदत मिळणार आहे.

    🔸  सदर तयार करण्यात आलेल्या अद्यावत नकाशामध्ये जिल्ह्यांतील महत्वाच्या प्रमुख बाबींची, संवेदनशिल ठिकाणांची, अपघात प्रवण क्षेत्र, रेल्वे स्टेशन, बस स्टैंड, मर्मस्थळे, धार्मिक स्थळे, पुतळे, महत्वाच्या यात्रा ठिकाणे, पर्यटन स्थळे, किल्ले, कारखाने, पुल, नदी, नाले, तलाव, धरणे व शासकीय कार्यालये इत्यादी बाबत सविस्तर माहीती संकलित करुन नकाशे तयार करण्यात आले आहेत. 

  🔹 अद्यावत नकाशामध्ये महाराष्ट्रालगत सीमावर्ती भागातील मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील जिल्हा- बालाघाट, राजनांदगाव तसेच गडचिरोली, भंडारा  जिल्हयांच्या सिमावर्ती प्रमुख भागांची, गावांची व भौगोलीक परिस्थीतींची इत्यंभूत माहिती समाविष्ठ करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील पोलीस स्टेशन निहाय अंतर्गत सविस्तर माहीती नकाशा मध्ये दर्शविण्यात आली असल्यामुळे गोंदिया जिल्हयातील अतिसंवेदनशिल भागातील माहिती करीता सदर नकाशांचा जिल्हा पोलीसांना निश्चीतच फायदा मिळणार आहे. सदरचे नकाशे एच. आर. पी. एम. इंडस्ट्रीज, नांदेड यांचेकडुन सुचीबद्ध  तयार करण्यात आलेले आहेत.

       🔹 मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली अद्यावत सूचीबद्ध नकाशे तयार करण्याकरिता नक्षल सेल येथील अधिकारी, अंमलदार तसेच सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व गोपनिय अंमलदार यांनी अथक परिश्रम, मेहनत घेवुन नकाशे तयार करण्यात आले असुन सर्व पोलीस स्टेशन व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय यांना वितरीत करण्यात आले आहेत.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट