महाड येथील सुकटगल्लीत आरोपी विकास शिंदे यांस विनापरवाना बेकायदेशीररित्या व्हिस्की विकताना ठोकल्या बेड्या..

उपसंपादक-राकेश देशमुख
महाड:-मंगळवार दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी आरोपी विकास भागोजी शिंदे रहाणार चोचिंदे , पोस्ट- दादली, ता.महाड, जि.रायगड यास एकुण ६ डझन व्हिस्की बाॅटलसह एकुण रक्कम रुपये ९३७५ / – मुद्देमालासह अटक केली आहे.
आरोपी विकास शिंदे हा १६ एप्रिल २०२४ रोजी सदर किमतीचा प्रोव्हिजन माल विनापरवाना बेकायदेशीररीत्या स्वतःचे ताब्यात बाळगुन विक्री करत असताना सुकटगललीतील बासंती देशी दारुच्या दुकानाचे बाजुला मिळून आला म्हणून महाड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. जाधव, पोलीस नाईक श्री. सावंत व पोलीस उपनिरीक्षक श्री. पवार यांनी त्याच्या विरोधात महाड शहर पोलीस ठाण्यात मुंबई पोलीस अधिनियम कलम ६५ (ई) अन्वये कारवाई केली आहे.
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com