सुगंधी तंबाखू,गुटखा व पानमसालयाची विक्री करणाऱ्या ५ आरोपीना महात्मा गांधी चौक पोलीसानी कसे घेतले ताब्यात पहा..

0
Spread the love

सह संपादक -रणजित मस्के

मिरज

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखू, गुटखा व पानमसालाची वितरण, विक्री व साठा करणा-या महाराष्ट्र व कर्नाटक राज्यातील आंतरराज्य टोळीतील ५ संशयित ताच्यात, सुगंधीत तंबाखू, गुटखा व पानमसालाच्या साठ्यासह एकूण १७,९५,८४४/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलीस स्टेशन

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज

गु.प.ता वेळ व ठिकाण

दि. १४.०७.२०२५ रोजी १८.२५ वा. कुपवाड एमआयडीसी रोड, पचार पाईप कारखान्याचे जवळ, मिरज

अपराध क्र आणि कलम

गु.र.नं. १७४/२०२५

भारतीय न्याय संहीता कलम १२३, २२३, २७४, २७५ ३(५) सह अन्न सुरक्षा मानके कायदा कलम ૨૬(૨)(1), ર૬(૨)(iv), ૨૭(૨)(d), ૨૭(૨)(e), ३०(२) (a), ३(१) (zz) (V), ५९ प्रमाणे

गु.दा.ता वेळ

दि. १५.०७.२०२५ रोजी

००.४७ या

कारवाई करणारे पोलीस अधिकारी आणि अंमलदार

फिर्यादी नाव

धनंजय विक्रम आघाव, अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.रा.), सांगली

माहितीचा स्रोत

श्री. संदीप शिंदे,

प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज

मा. श्री. संदीप घुगे, पोलीस अधिक्षक, सांगली

मा. श्रीमती कल्पना चारवकर, अपर पोलीस अधिक्षक, सांगली मा. श्री. प्रणिल गिल्डा, उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग श्री. संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांचे मार्गदर्शनाखाली

पोलीस उपनिरीक्षक श्रीमती रुपाली गायकवाड, श्री संदीप गुरव, पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन कुंभार, अभिजीत धनगर, अभिजीत पाटील, सर्जेराव पवार, पोलीस नाईक राहूल क्षीरसागर, नानासाहेब चंदनशिवे,

पोलीस कॉन्स्टेबल बसवराज कुंदगोळ, विनोद चव्हाण, राजेंद्र हारगे, अमोल तोडकर चालक श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीशकुमार पाटील, चालक पोलीस हेडकॉन्स्टेबल निवास माने, सुधीर खोंद्रे

सायबर पोलीस ठाणेकडील सहा. पोलीस निरीक्षक श्रीमती रुपाली बोबडे, पोलीस उपनिरीक्षक श्री. अफरोज पठाण, पोकों गणेश नरळे, कॅप्टन गुंडवाडे, अभिजीत पाटील

संशयित नाव व पत्ता

१) मुख्तार मेहबूब मुजावर, रा. बिसूर बस स्टेंडजवळ, बिसूर, ता. मिरज

२) उमेश शंकर पाटील, रा. रतुगल्ली रेल्वे स्टेशनजवळ, कुडची, ता. अथणी, जि. बेळगांव, कर्नाटक

३) सलीम गुरुसाब आयटी, रा. शाहूनगर, बेळगांव, कर्नाटक

४) नयुम दिलावर शेख, रा. गणेशनगर, आटपाडी, ता. आटपाडी

जप्त मुद्देमाल

५) भरतेश सिध्दराम कुडचे, रा. नदीवेस, वेताळ मंदीराजवळ, मिरज, ता. मिरज

एकूण १७,१५,८४४/- रु. चा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखू, गुटखा व

पानमसालाचा साठा व इतर साहीत्य असा मुद्देमाल जप्त केला आहे.

गुन्ह्याची थोडक्यात हकीकत:

मा. भारत सरकार यांच्या नशामुक्त भारत अभियान” चे पार्श्वभूमीवर सांगली जिल्हयातील नशेच्या पदार्थाच्या वितरण व विक्री तसेच नशाखोरीवर अंकुश ठेवून नशेचे पदार्थ विक्री तसेच वितरण करणारे संशयित इसमांचे विरोधात प्रभावी व सातत्यपूर्ण कारवाईसाठी श्री. संदीप घुगे, मा. पोलीस अधिक्षक सांगली व श्री. प्रणिल गिल्डा, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, मिरज विभाग यांनी विशेष सूचना देवून गांजा व सुगंधी तंबाखू, गुटखा, पानमसाला तसेच नशेच्या साहीत्याची विक्री करणारे लोकांवर प्रभावी कारवाई करून गुन्हे दाखल करण्याबाबत आदेश दिले होते.
सदर आदेशाप्रमाणे संदीप शिंदे, सहा. पोलीस निरीक्षक, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे, मिरज यांनी तात्काळ कारवाई करीत नशेच्या पदार्थांचा साठा, विक्री च वितरण करणारे इसमांबाबत माहीती उपलब्ध करुन त्यांचेवर प्रभावी कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणेकडील डि.बी. पथकाकडील अधिकारी व अंमलदार यांना सुचित केले होते. त्यानुसार महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील डी. बी. पथकाने वेळोवेळी कारवाई करीत नशाखोरी व अंमलीपदार्थ तसेच सुगंधी तंबाखू, गुटखा, पानमसाला विक्री रोखण्याचे अनुषंगाने पोलीस ठाणे हद्दीत प्रभावीपणे छापा कारवाई करुन उत्कृष्ठ कामगिरी केली होती.

दि. १४.०७.२०२५.२०२५ रोजी मिळाले गोपनीय माहीतीवरुन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडील नमूद पोलीस पथक व श्री. अफरोज पठाण, पोलीस उपनिरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, सांगली व त्यांचेकडील नमूद पथकाने संयुक्तपणे कायदेशीर कारवाई करीत इसम नामे मुख्तार मेहबूच मुजावर, रा. बिसूर बस स्टैंडजवळ, विसूर, ता. मिरज यास ताब्यात घेवून त्याचेकडून महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखू व पानमसालाचा एकूण ८२,६००/- रु. किमतीचा साठा जप्त केला असून सदरचे प्रतिबंधीत सुगंधी तंबाखूचे कारवाईचाबत अन्न सुरक्षा अधिकारी, अन्न व औषध प्रशासन (म.रा.), सांगली यांना अवगत करुन त्यांचे फिर्यादीवरुन वर नमूद प्रमाणे दि. १५.०७.२०२५ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर आरोपीस मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता सदर आरोपीस मा. न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली होती. सदर अटक आरोपी यास तपासादरम्यान अधिक पिश्वासात घेवून त्याचेकडे कौशल्यापुर्ण केला असता, त्याने सदरचा सुगंधी तंबाखू, गुटखा व पानमसालाचा साठा हा कर्नाटक राज्यातून आणला असून तो सांगली जिल्हयातील पानपट्टीधारकांना चढ्या दराने किरकोळ स्वरुपात विक्री करुन वितरण करीत असल्याचे निष्पन्न झाले होते.

सदर आरोपीकडून तपासादरम्यान मिळालेल्या माहीतीवरुन श्री. संदीप शिंदे, प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे व सायबर पोलीस ठाणे, सांगली कडील अधिकारी व अंमलदार यांची ०३ वेगवेगळी पथके तयार करुन त्यांना कर्नाटक राज्यात रवाना करुन गुन्हयातील इतर संशयितांचा शोध घेण्याबाबत आदेशीत केले होते. त्याप्रमाणे नमूद पथकातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांनी लागलीच मा. वरीष्ठांचे आदेशाने कारवाई करीत गुन्हयातील वितरण, विक्री व साठा व्यवस्थेतील साखळी उघड करीत सदरचे गुन्हयातील सुगंधी तंबाखू माल निर्मीती करणारा मुख्य संशयीत नामे १) सलीम गुरुसाथ आवटी, रा. शाहूनगर, बेळगांव, राज्य कर्नाटक यास तसेच सदरचा सुगंधी तंबाखूचा माल सांगली जिल्हयामध्ये पाठविण्यामागे असलेला मुख्य सूत्रधार २) उमेश शंकर पाटील, रा. रतुगल्ली रेल्वे स्टेशनजवळ, कुडची, ता. अथणी, जि. बेळगांव, राज्य कर्नाटक यांना व सदरचा सुगंधी तंबाखूचा माल सांगली जिल्हयामध्ये वितरण करणारे मुख्य वितरक नामे ३) नयुम दिलावर शेख, रा. गणेशनगर, आटपाडी, ता. आटपाडी ष ४) भरतेश सिध्दराम कुडचे, रा. नदीचेस, वेताळ मंदीराजवळ, मिरज, ता. मिरज यांना गुन्हयाचे तपासकामी ताब्यात घेणेत आलेले असून यातील आरोपी क्र. १) मुख्तार मेहबूच मुजावर, रा. बिसूर धस स्टैंडजवळ, बिसूर, ता. मिरज याचेकडून ८२,६००/- रु., आरोपी क्र. ४) नयुम दिलावर शेख, रा. गणेशनगर, आटपाडी, ता. आटपाडी याचेकडून १०,१८,५४४/- रु. प आरोपी क्र. ५) भरतेश सिध्दराम कुडचे, रा. नदीचेस, वेताळ मंदीराजवळ, मिरज, ता. मिरज याचेकडून ६,९४,७००/- रु. चा असा एकूण १७,९५,८४४/- रु. किंमतीचा महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखू, गुटखा व पानमसालाचा एकूण साठा जप्त केला आहे. सदर कारवाई दरम्यान महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधीत केलेल्या सुगंधी तंबाखू, गुटखा व पानमसाला यांची साठा, विक्री व वितरण व्यवस्थेचे कर्नाटक-महाराष्ट्र कनेक्शन समोर आलेले असून त्याअनुषंगाने सदर गुन्हयाचा पुढील तपास मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे कडील पोलीस पथक करीत असून यातील आरोपी क्र. २ ते ५ यांना मा. न्यायालयासमक्ष हजर केले असता मा. न्यायालयाने दि. १८.०७.२०२५ रोजीपर्यंत पोलीस कोठडी रिमांड मंजूर केले आहे.

महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेकडून ” नशामुक्त भारत अभियान” पार्श्वभूमीवर नशायुक्त पदार्थ, गांजा व सुगंधी तंबाखू, गुटखा, पानमसाला तसेच नशेच्या साहीत्याची साठा, विक्री तसेच वितरण करणा-या व्यवस्थेची पाळेमुळे खणून काढणेच्या अनुषंगाने नशाखोरी विरोधी कारवाईत सातत्य राखत जास्तीत जास्त प्रभावी कायदेशीर कारवाई करुन नशेखोरीच्या अवैध व्यवसायाचा समूळ बीमोड करण्याच्या उपाययोजना राबविण्यात येत असून नागरीकांनी नशायुक्त पदार्थाचाचत माहीती पोलीस प्रशासनास देण्याचे महात्मा गांधी चौक पोलीस ठाणेतर्फे आवाहन करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट