माणगाव येथील अमित कॉम्प्लेक्स मधील फ्लॅटच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्यामुळे सुदैवाने दोन चिमुकल्या बचावल्या…

प्रतिनिधी- सचिन पवार
रायगड-माणगांव
अमित कॉम्प्लेक्स येथील रहिवाशांच्या जीवाला झाला धोका निर्माण…!
माणगांव :-निकृष्ट दर्जाच्या कामाविरोधात येथील रहिवाशांनी दिली माणगाव पोलीस ठाण्यात लेखी तक्रार माणगाव येथे प्रसिद्ध अमित कॉम्प्लेक्स येथील रहिवाशांकडून पाणीपुरवठा, सांडपाणी समस्या व सार्वजनिक सोयी सुविधा नसल्याने तसेच रहिवाशांना बिल्डर कडून भोगवटा प्रमाणपत्र (ओ. सी) देखील मिळत नसल्यामुळे अनेक गैरसोयिंच्या विरोधात येथील बिल्डिंग व बंगल्यातील रहिवाशांचा संघर्ष चालू असतानाच रविवारी दुपारी दोन वाजताच्या च्या सुमारास अमित कॉम्प्लेक्स च्या डी विंग मधील ,फ्लॅट नं २०२ येथील रहिवाशी मिसाळ यांच्या फ्लॅट मधील एका रूमच्या स्लॅब चा काही भाग अचानक कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

रूमचा स्लॅबचा काही भाग अचानक कोसळला त्यावेळी त्या रूम मध्ये काही अंतरावर मिसाळ यांच्या दोन लहान मुली खेळत होते, मात्र त्यांच्यापासून काही अंतरावर स्लॅब कोसळल्यामुळे चिमुकल्या मुली सुदैवाने बचावल्या . या घटने नंतर अमित कॉम्प्लेक्स येथील इतर फ्लॅट मध्ये ही छत च्या स्लॅब चा काही भाग कोसळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे .

अमित कॉम्प्लेक्स च्या A ते G सर्व विंग चे रहिवासी आधीच प्राथमिक सुविधांसाठी संघर्ष करत आहेत अशातच अचानक स्लॅब चा काही भाग कोसळत असल्याने येथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण होत असल्याची गंभीरता लक्षात येताच येथील संतप्त रहिवाशी एक जूट होऊन तात्काळ एक्शन मोड वर उतरले व रहिवाशांकडून तात्काळ माणगाव पोलीस ठाण्यात धाव ठोकून माणगाव पोलीस ठानेचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्याकडे अमित कॉम्प्लेक्स च्या संपूर्ण बिल्डिंग चा काम निकृष्ट दर्जाच्या झाला असल्याने येथील रहिवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे बिल्डर च्या विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार देण्यात आली आहे. तक्रार मिळताच पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी स्वतः तात्काळ घटनास्थळी पोहचून पाहणी करण्यात आली.
अमित कॉम्प्लेक्स चे बिल्डर रहिवाशांच्या अनेक तक्रारीकडे पूर्ण पणे दुर्लक्ष करत असून कुठली ही दाद देत नाही त्यामुळे संतप्त रहिवाशांकडून नगरपंचायत कडे स्ट्रक्चर ऑडिट (structure audit)करण्यात यावा व संबंधित बिल्डर विरोधात प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे , तसेच बिल्डर ने अमित कॉम्प्लेक्स येथील अनेक गैरसोयी व जीवाला निर्माण झालेल्या धोक्याचा तात्काळ निवारण करण्यात यावा अन्यथा रहिवाशांकडून नगरपंचायत माणगाव समोर उपोषण करण्यात येईल असे संकेत संतप्त रहिवाशांकडून देण्यात आले आहेत .
ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com