उपविभागीय पोलीस अधिकारी, तिरोडा श्री. साहिल झरकर, यांचे पथकाने अवैध गौण खनिज रेती चोरी प्रकरणी पो. ठाणे तिरोडा येथे केला गुन्हा नोंद…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :

ट्रॅक्टर- ट्रॉली,1 ब्रास रेती व ईतर साहित्य असा एकूण 06 लाख 3 हजार 850/-रुपयाचा मुद्देमाल केला जप्त .

🎯 पोलीस अधीक्षक, गोंदिया श्री. निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक, गोंदिया, कॅम्प देवरी, श्री. नित्यानंद झा, यांनी आगामी निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हयातील सर्व पोलीस ठाणे प्रभारी यांना त्यांचे पोलीस ठाणे हद्दीत चालणारे अवैध धंदे दारू, मटका, जुगार, अवैध गौण खनिज रेती चोरी,यासारखे व ईतर अवैध धंदे, यांचेवर प्रभावी धाडी घालून जिल्ह्यातील सर्व अवैध धंदे समुळ नष्ट करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत निर्देश दिले आहेत…. यानिमित्ताने संपुर्ण जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमाविरूद्ध सर्व पोलीस ठाणे हद्दीतील अवैध धंदयावर, छापे टाकून कारवाईची मोहीम राबविण्यात येत आहे….

या अनुषंगाने वरिष्ठांचे निर्देशाप्रमाणे, व मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी, श्री. साहिल झरकर, उपविभाग तिरोडा, यांचे पोलीस पथकाने दिनांक- 29/03/2024 रोजी अवैध गौण खनिज रेती चोरी प्रकरणी पो. ठाणे तिरोडा हद्दितील मौजा – चीरेखणी येथे कारवाई केली असता….अवैधरीत्या गौण खनिज रेतीची चोरी करून वाहतूक करतांना 1 इसम हे त्यांचे ताब्यातील ट्रॅक्टर ट्रॉलीसह ज्यात अंदाजे 1 ब्रास रेती (गौण खनिज) सह मिळुन आल्याने…रीतसर जप्तीची कायदेशीर कारवाई करण्यात आली…

सदर प्रकरणी पोलीस ठाणे तिरोडा येथे आरोपी नामे- प्रवीण शंकर बिसेन वय 43 वर्षे रा. कवलेवाडा याचे विरुद्ध कलम 379, भादवी अन्वये गुन्हा नोंदविण्यात आले आहे… नमूद आरोपी याचे ताब्यातून- गौण खनिज (रेती) चोरी करीता वापरलेले 1 सोनालिका कंपनी चे ट्रॅक्टर ट्रॉली सह ज्यात अंदाजे 1 ब्रास रेती व साहित्य टीकास, फावडे असा एकूण किंमती 06 लाख 3 हजार 850/- रु चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

सदरची कारवाई मा. वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सूचनाप्रमाणे उपविभागीय पोलीस, उपविभाग तिरोडा श्री. साहिल झरकर यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय कार्यालयातील पोलीस पथक पोलीस अंमलदार पो.हवा. गिरीष पांडे, बावणे, सोनवणे यांनी केली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट