उपविभागीय पोलीस अधिकारी देवरी यांचे कार्यालयीन विशेष पथकाची अवैध धंद्यावर धडक कारवाई…

0
Spread the love

उपसंपादक-रणजित मस्के

गोंदिया :- मा. पोलीस अधिक्षक गोंदिया श्री. निखिल पिंगळे, व अपर पोलीस अधिक्षक, श्री. नित्यानंद झा, यांचे निर्देश अन्वये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर,उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनात अवैध धंदयावर कारवाई करण्याकरीता विशेष पथक गठीत करण्यात आले असुन विशेष पथका द्वारे देवरी उपविभाग अंतर्गत पो. स्टे. परिसरातील अवैध धंद्याविरुद्ध कारवाई ची मोहीम राबविण्यात येत आहे.

या अनुषंगाने पथकाने दि. 27/12/ 2023 रोजी गोपनिय सुत्रांकडुन मिळालेल्या माहीतीच्या आधारे सडक/अर्जुनी येथील सैय्यद नौशाद अनवर अली वय 37 वर्षे हा उस्मान पान सेंटर चे मागील बाजुस सट्टापट्टी लिहीत असल्याची माहीती प्राप्त झाल्याने त्याचेवर छापा टाकला असता सट्टापट्टी, पेन व नगदी 195 रुपयाचा मुद्दमाल मिळुन आल्याने आरोपी -सैय्यद नौशाद अनवर अली रा. सडक/अर्जुनी यांचे विरुध्द पो.स्टे. डुग्गीपार येथे अप .क्र. 456/2023 कलम 12 (अ) महाराष्ट्र जुगार कायदयान्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

तसेच विशेष पथकाला सडक/अर्जुनी येथील शेंडा रोडवर एक किया कंपनीच्या मागील बाजुस संशयीत रित्या खाकी रंगाचे बॉक्स दिसुन आल्याने सदर वाहन चालकास वाहन थांबवून तपासणी केली असता वाहन क्र. वाहन क्र. क्र.MH-35 AR-1934 मध्ये विदेशी इंग्रजी दारु रॉयल्स स्टॅग कंपनीचे प्रत्येकी 180 मिली. ने भरलेले 192 पव्वे प्रत्येकी किं. 180/- रु प्रमाणे एकुण किं. 34 हजार 560/- रुपयांचा माल व एक किया कंपनीची वाहन क्र.MH-35 AR-1934 किं.9 लाख रुपये असा एकुण 9 लाख 34 हजार 560/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून नमूद वाहनाचे चालक आरोपी नामे- शितल सुकराम उईके वय 41 वर्षे रा. उशीखेडा / शेन्डा ता. सडक अर्जुनी जि. गोंदिया यांचे विरुद्ध पो.स्टे. डुग्गीपार येथे अप.क्र. 455/2023 कलम 65 (ई), 77 (अ) महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे….

सदरची कामगिरी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. संकेत देवळेकर,उपविभाग देवरी यांचे मार्गदर्शनात उपविभाग देवरी चे विशेष पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांनी केलेली आहे.

ताजी बातमी व जाहिरातीसाठी संपर्कः
मोबा.नं. 9920601001
info@surakshapolicetimes.com
diptibhogal@surakshapolicetimes.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

रिसेंट पोस्ट